आता सिनेमात हॅंडपंप नाही तर त्याहून भलीमोठी वस्तू उखडताना दिसणार सनी देओल.. व्हायरल फोटो उडवेल झोप Gadar 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gadar 2

Gadar 2: आता सिनेमात हॅंडपंप नाही तर त्याहून भलीमोठी वस्तू उखडताना दिसणार सनी देओल.. व्हायरल फोटो उडवेल झोप

Gadar 2: २००१ साली गदर एक प्रेम कथा सिनेमा रिलीज झाला अन् त्यातील सनी देओल-अमीषा पटेलच्या प्रेमकहाणीनं अख्ख्या भारताला आपल्या प्रेमात पाडलेलं आपण पाहिलं असेल. या सिनेमात तारा सिंग आपल्या सकीना खातर थेट पाकिस्तान गाठतो.

सिनेमातील जबरदस्त डायलॉग आणि हॅंडपंप उखडण्याचा सीन आजही लोकांच्या आठवणीत एकदम फीट्ट आहे. आता २२ वर्षानंतर सिनेमाचा सीक्वेल येत आहे,ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

अर्थात,'गदर 2' मध्ये तारा सिंग हॅंडपंप किंना बैलगाडी उखडताना दिसणारा नाही पण त्याहून अधिक भारी भक्कम वस्तू तो उखडताना दिसणार आहे.

'गदर 2' मधील एक फाइट सीक्वेन्स ऑनलाइन लीक झाला आहे. या व्हिडीओत धूळीनं भरलेल्या मैदानात शूट केलं गेलं आहे. जिथे सनी देओल काळा-कुर्ता पजामा आणि मॅचिंग पगडी घातलेल्या पेहरावात दिसत आहे.

तो चक्क भलामोठा खांब उखडत..त्यानंतर तो पाठीवर झेलत शत्रूशी दोन हात करताना दिसत आहे. व्हिडीओत सनी देओल रागानं लालबूंद होत सीमेंटचा खांब उखडताना दिसत आहे.(Gadar 2 sunny deol seen uprooting huge object ofr skina)

Gadar 2 Scene Image

Gadar 2 Scene Image

हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. सगळे लोक या सीक्वेन्सला पाहून खूपच उत्सुक झालेयत सिनेमा पाहण्यासाठी. याआधी सनी देओलच्या 'गदर 2' मधून एक सीन व्हायरल झाला होता,ज्यात बैलगाडीचं चाक चक्क तो हाथानं गोल गोल सहज फिरवताना दिसत होता.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार सिनेमात एक गाणं महत्त्वाच्या सीन प्रसंगी सुरु होईल जिथे जुन्या 'गदर'च्या आठवणी ताज्या होतील. ते गाणं कथेला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल.

कदाचित आपल्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात असेल की 'गदर' मध्ये या गाण्याचे दोन व्हर्जन होते, ज्याला सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्यावर चित्रित केलं गेलं होतं.

आता 'गदर 2' मध्ये हे गाणं रिक्रिएट करुन कसं बनलंय हे येणारा काळच सांगेल. ११ ऑगस्ट २०२३ रोजी सिनेमा प्रदर्शित केला जात आहे. उत्कर्ष शर्मा,सिमरत कौर,लव सिन्हा आणि मनीष वधावा सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

'गदर' मध्ये तारा सिंगचा मित्र दरमियान सिंगची भूमिका करणारे विवेक शौक ' गदर 2' मध्ये दिसणार नाही. 2011 मध्ये हार्टअटॅकनं त्यांचे निधन झाले आहे.

तसंच सिनेमात न्यूजपेपर एडिटरच्या व्यक्तिरेखेत दिसलेले मिथलेश चतुर्वेदी यांना देखील आपण 'गदर 2' मध्ये मिस करू.

सिनेमाचं नरेशन देणारे ओम पुरी देखील आता आपल्यात नाहीत. त्यांचे देखील 2017 मध्ये निधन झाले आहे.