'गदर'समोर 'बाहुबली' फिका!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

गदरने तब्बल पाच हजार कोटीची कमाई केली होती असे सांगून दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी खळबळ उडवून दिली आहे. 

मुंबई :बाहुबली 2 ने एक हाती दीड हजार कोटीची कमाई केल्यामुळे सर्वत्र या सिनेमाचे कौतुक होताना दिसते. त्याचवेळी या सिनेमाने केलेली कमाई ही काहीच नसून गदरने तब्बल पाच हजार कोटीची कमाई केली होती असे सांगून दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी खळबळ उडवून दिली आहे. 

आपले म्हणणे पुढे रेटताना ते म्हणाले, गदर हा सिनेमा 2001 मध्ये आला. त्यावेळी या सिनेमाने 265 कोटीचा गल्ला जमवला. त्यावेळी तिकीट दरही केवळ 25 रूपये होते. आज त्याची किंमत पाच हजार कोटीपेक्षा जास्त आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लगानच्या गल्ल्याबाबतही चर्चा रंगली आहे. कारण हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. 

प्रभास, राणा डुग्गुबत्ती यांच्या अभिनयाने नटलेल्या बाहुबली 2 ने जगभरात दीड हजार कोटींची कमाई केली आहे. 

Web Title: Gadar is Bigger than Bahubali