Gadar: तारासिंग आणि सकिनाची थरारक प्रेमकथा घेऊन 23 वर्षांनी पुन्हा येतोय 'गदर'; पण यावेळी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gadar ek prem katha to hit theaters again release on 9 june two months before the sequel

Gadar: तारासिंग आणि सकिनाची थरारक प्रेमकथा घेऊन 22 वर्षांनी पुन्हा येतोय 'गदर'; पण यावेळी..

Gadar movie : सनी पाजी म्हणजे देओल आणि अमीषा पटेल यांचा सर्वाधिक गाजलेला आणि अनेकांची झोप उडवणारा 'गदर' सिनेमा अजूनही कोणी विसरलेलं नाही. शिख समाजाचा 'तारसिंग' आणि इस्लाम धर्मीय 'सकिना' यांच्या प्रेमाची ही कथा त्यावेळी तूफान चालली.

भारत पाकिस्तान फाळणी आणि त्यात ताटातूट झालेलं हे प्रेम प्रेक्षकांना खूपच भावलं. दोन भिन्न धर्मांची ही प्रेमकथा प्रथमच मोठ्या पडद्यावर मांडली केली. हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता.

लवकरच या चित्रपटाचा दूसरा भाग आपल्या भेटीला येणार आहे. पण त्याच पार्श्वभूमीवर दोन महीने आधी 'गदर'चा जुना भाग पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

(gadar ek prem katha to hit theaters again release on 9 june two months before the sequel)

काही दिवसांपूर्वीच 'गदर -2' baबाबत घोषणा करण्यात आली. त्यानंतर या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. दुसऱ्या भागातही सनी देओल आणि अमिषा पटेल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये सनी देओल मोठा हातोडा घेऊन उभा असलेला दिसला.

आता या चित्रपटाच्या (bollywood )प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून 11 ऑगस्ट रोजी 'गदर - 2' प्रदर्शित होत आहे. पण त्यापूर्वी 'गदर - एक प्रेम कथा' हा पाहिला भाग ही चित्रपट गृहात दाखवण्यात येणार आहे. अभिनेता सनी देओलने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

सनीने या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, तेच प्रेम, तीच कथा, पण यावेळेस अनुभव वेगळा असेल. ९ जून रोजी ‘गदर एक प्रेम कथा’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तब्बल २२ वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे. यावेळी चित्रपटाची क्वालिटी आणि साऊंडचा दर्जा हा अत्यंत वेगळा असणार आहे.