गदर आणि लगानला 16 वर्षे पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

बरोबर सोळा वर्षांपूर्वी 15 जूनला हिंदी सिनेउद्योगात दोन एेतिहासिक कामगिरी करणारे सिनेमे आले. पहिला होता आशुतोष गोवारीकर यांचा लगान, आणि दुसरा होता सनी देओल आणि आमिषा पटेल यांचा गदर. या दोन्ही सिनेमांनी आपआपली तारीख जाहीर केली आणि चर्चेला उधाण आले होते.

मुंबई : बरोबर सोळा वर्षांपूर्वी 15 जूनला हिंदी सिनेउद्योगात दोन एेतिहासिक कामगिरी करणारे सिनेमे आले. पहिला होता आशुतोष गोवारीकर यांचा लगान, आणि दुसरा होता सनी देओल आणि आमिषा पटेल यांचा गदर. या दोन्ही सिनेमांनी आपआपली तारीख जाहीर केली आणि चर्चेला उधाण आले होते. दोन मोठे सिनेमे अशा पद्धतीने एकत्र प्रदर्शित केले जाऊ नयेत असा सूर होता. पण या दोघांनीही तिकीट खिडकीवर अमाप यश मिळवले. 

15 जून 2017 ला हे दोन्ही सिनेमे रीलीज होऊन काल 16 वर्षे झाली. लगान हा सिनेमा आमीरला देण्यापूर्वी आशुतोष गोवारीकरने शाहरूख खानकडे भूवनच्या रोलसाठी विचारणा केली होती. त्याने नकार दिल्यावर दिग्दर्शक अभिषेक बच्च्नकडेही गेला होता. पण या दोघांनी नकार दिल्यावर आमीरने हा रोल घेतला आणि केवळ रोल केला नाही, तर हा सिनेमा  प्रोड्यसही केला. 

Web Title: Gadar Lagaan completes 16 years