Wilko Johnson: 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या सर इलेन पेनचं निधन, सीरिजमध्ये होते सर्वात 'हेटेड कॅरॅक्टर' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wilko Johnson

Wilko Johnson: 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या सर इलेन पेनचं निधन, सीरिजमध्ये होते सर्वात 'हेटेड कॅरॅक्टर'

Game of Thrones actor Wilko Johnson passed away: ज्या मालिकेनं जगभरातील नेटकऱ्यांना वेडं केलं त्या गेम ऑफ थ्रोन्समधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यांचे नाव विल्को जॉन्सन असे आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गंभीर आजारानं त्यांचे निधन झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

विल्को हे गेम ऑफ थ्रोन्समधून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्यांचा चाहतावर्गही मोठा होता. डॉ. फीलगुड म्युझिशियन म्हणूनही ते लोकप्रिय झाले होते. त्यांना कॅन्सरची लागण झाली होती. अखेर त्याच्याशी त्यांची झुंज अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या निधनाची बातमी व्हायरल होताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हॉलीवूडमधील चाहते, सेलिब्रेटी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Vikram Gokhale : विक्रम गोखलेंची प्रकृती चिंताजनक,अफवांवर विश्वास ठेवू नका

सोशल मीडियावर विल्को यांच्या जाण्याची बातमी व्हायरल झाली आहे. चाहत्यांनी त्यांच्या कुटूंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. व्हायरल झालेल्या एका व्टिटमध्ये म्हटले गेले आहे की, आम्हाला कधीही असे वाटले नव्हते की, ही बातमी तुम्हाला सांगण्याची वेळ येईल. ती म्हणजे विल्को यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरच्या आजारानं त्रस्त होते. त्यांच्या कुटूंबासाठी आताचा संघर्षाचा काळ आहे. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचेही त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: Vikram Gokhale : 'उपचारांना प्रतिसाद नाही'! डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न, पत्नी वृषाली यांची माहिती