गश्मिरसोबत थिरकले गिरीजाचे पाय

टीम ई सकाळ
रविवार, 23 जुलै 2017

मराठी फिल्म इंडस्ट्रीचा हार्टथ्रोब गश्मीर महाजनीने २००० साली पुण्यामध्ये त्याचा डान्स स्टुडियो सुरू केला. यंदा त्याच्या डान्स स्टुडियोला १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. शुक्रवारी या डान्स स्टुडियोचा वार्षिक समारंभ झाला. कार्यक्रमाला स्पृहा जोशी, समीर विव्दंस, सीमा देशमुख, सतीश आळेकर, असे मराठी फिल्मइंडस्ट्रीतले अनेक कलाकार उपस्थित होते.
 

पुणे : मराठी फिल्म इंडस्ट्रीचा हार्टथ्रोब गश्मीर महाजनीने २००० साली पुण्यामध्ये त्याचा डान्स स्टुडियो सुरू केला. यंदा त्याच्या डान्स स्टुडियोला १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. शुक्रवारी या डान्स स्टुडियोचा वार्षिक समारंभ झाला. 
 
वार्षिक समारंभाच्या सुरूवातीला जीआरएम डान्स स्टुडियोने सीमेवर लढणा-या जवानांना, अमरनाथ यात्रेत बळी पडलेल्या यात्रेकरूंना आणि शहिदांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला स्पृहा जोशी, समीर विव्दंस, सीमा देशमुख, सतीश आळेकर, असे मराठी फिल्मइंडस्ट्रीतले अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री गिरीजा ओकने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि गश्मिर सोबत छोटासा परफॉर्मन्सही केला.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो, गश्मिरचा डान्स परफॉर्मन्स. टाळ्या आणि शिट्यांच्या वर्षावात गश्मिरने त्याच्या मराठी सिनेमातल्या गाण्यांवर आणि त्याचा डान्सिंग आयडल सुपरस्टार गोविंदाच्या ‘टनटनाटन टनटन तारा’ ह्या गाण्यावर परफॉर्मन्स दिला.

गश्मीर महाजनी ह्यावेळी म्हणाला की, “माझ्या ह्या डान्सिंग स्टार्सचा मला अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी कोरीओग्राफी करतानाही मला खूप मजा येते.“
 

Web Title: Gashmir mahajani girija oak dance esakal news