गश्मीर महाजनीने गमावले सिक्स पॅक्स!

टीम ई सकाळ
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणारा हँडसम हंक गष्मीर
महाजनी याने मला काहीच प्रॉब्लेम नाही या फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित त्याच्या आगामी मराठी चित्रपटासाठी इतक्या वर्षांपासून मेहनतीने
कमावलेले सिक्स पॅक्स गमावले आहेत.

मुंबई : मराठी फिल्म इंडस्ट्रीतील फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणारा हँडसम हंक गष्मीर
महाजनी याने मला काहीच प्रॉब्लेम नाही या फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित त्याच्या आगामी मराठी चित्रपटासाठी इतक्या वर्षांपासून मेहनतीने
कमावलेले सिक्स पॅक्स गमावले आहेत.

अभिनेता म्हटलं की फिट आणि एनी टाईम प्रेझेंटेबल असणं गरजेचं असतं. या
फिटनेसबाबत संपूर्ण मराठी फिल्म इंडस्ट्रीत फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणाऱ्या गष्मीरने मात्र गेली ८-१० वर्ष रोज न चुकता दिवसातील ४५ मिनिटं व्यायाम करून कमावलेली
बिल्ट मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत हसत हसत गमावली. या चित्रपटासाठी गष्मीर ने
फक्त पात्राची गरज आहे म्हणून सिक्स पॅक्सना बाय-बाय करत त्याचा रोजचा व्यायाम, डाएट
सर्व काही सोडून मस्तपैकी चमचमीत वडा पाव, बर्गर, पिझ्झा खाऊन पोट वाढेपर्यंत मनसोक्त
खाण्याचा आनंद लुटला आहे.

या बाबतीत विचारले असता तो सांगतो की 'कोणतीही भूमिका असो एका अभिनेत्याने त्याच्या भूमिकेचा अभ्यास करणं गरजेचं असतं, असं म्हणतात पण मला असं वाटतं की भूमिकेचा अभ्यास म्हणजे स्वतःचा अभ्यास करणं होय. म्हणूनच या माझ्या पात्रासाठी
माझं सर्व डाएट, व्यायाम सोडला. थोडंसं वजन आणि पोट वाढवलं ज्याने आपोआप माझ्या
बॉडी लँग्वेज मध्ये फरक पडत गेला, जी माझ्या भूमिकेची गरज होती.' 

 

Web Title: gashmir mahajani six pacs MKPN esakal news