लग्नानंतर गौहर खानने घेतला करिअरमधील मोठा निर्णय, यापुढे 'ही' गोष्ट कधीच करणार नाही

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 7 January 2021

काही दिवसांपूर्वीच तिच्या 'तांडव' वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिरीजच्या प्रमोशन दरम्यान गौहरने तिच्या करिअरविषयीचा सगळ्यात मोठा खुलासा केला आहे.

मुंबई- प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान सध्या तिच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत आहे. गौहर खानने काही दिवसांपूर्वीच संगीतकार इस्माईल दरबारचा मुलगा जैद दरबारसोबत लग्न केलं. जैद प्रसिद्ध अभिनेता आणि कोरिओग्राफर आहे. लग्नानंतर गौहर खान सोशल मिडियावर खूप ऍक्टीव्ह आहे. इतकंच नाही तर लग्नानंतर ती तिच्या आगामी प्रोजेक्टवरही काम करतेय. काही दिवसांपूर्वीच तिच्या 'तांडव' वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिरीजच्या प्रमोशन दरम्यान गौहरने तिच्या करिअरविषयीचा सगळ्यात मोठा खुलासा केला आहे.

हे ही वाचा: साऊथ सुपरस्टार विजयच्या 'विजय द मास्टर' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, पाहा पहिली झलक  

गौहर खान अली अब्बास जफरच्या आगामी 'तांडव' वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. नुकताच तिने एका प्रसिद्ध वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीनुसार, गौहर म्हणाली की तिने आता कित्येक वेब शोज ना नकार दिला आहे. याचं कारण म्हणजे ती आता बोल्ड सीन्स देणार नाहीये. गौहरने सांगितलं की, ''मी पूर्णपणे या गोष्टीवर अडून आहे की मी आत्ता उगाचच बोल्ड सीन्स करणार नाही. एक अभिनेत्री म्हणून माझं कर्तव्य आहे की मी त्या भूमिकेला न्याय देऊन जी मी पडद्यावर साकारेन. मात्र काही लाईन्स मी आखु इच्छिते. खासकरुन जेव्हा त्या कंटेटच्या बाबतीत असेल ज्यामध्ये माझा समावेश असेल.''

गौहरचं म्हणणं आहे की ''केवळ त्या प्रोजेक्टचा भाग होण्यासाठी मा माझ्या लाईन क्रॉस करणार नाही. माझ्याकडे ज्या काही भूमिका आल्या त्या मी पूर्ण मनाने करु शकणार नाही असं मला वाटलं म्हणून मी त्या करायला नकार दिला मग तो मोठा प्रोजेक्ट का असेना.''  

gauahar khan revealed she does not want to do bold scenes rejected certain web shows  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gauahar khan revealed she does not want to do bold scenes rejected certain web shows