'ती सर्व फळं मी विकत घेईन'; रस्त्यावर फळं फेकणाऱ्या महिलेवर गौहरचा संताप | Gauhar Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gauhar khan

'ती सर्व फळं मी विकत घेईन'; रस्त्यावर फळं फेकणाऱ्या महिलेवर गौहरचा संताप

सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओखळली जाणारी अभिनेत्री गौहर खानने (Gauahar Khan) भोपाळमधील एका व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक संतप्त महिला फळ विक्रेत्याच्या गाडीतून फळं रस्त्यावर फेकताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवरील एका पापाराझी अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओवर गौहरने संताप व्यक्त केला. व्हिडीओमधील संबंधित महिलेला तिनं 'लूजर' म्हटलं आणि तिच्या वागणुकीची निंदा केली. इतकंच नव्हे तर नुकसान सोसणाऱ्या फळ विक्रेत्याची आर्थिक मदत करण्यासाठीही तिने हात पुढे केला. (Bhopal Viral Video)

'रागाच्या भरात असं कृत्य करताना त्या महिलेला स्वत:ची लाज वाटली पाहिजे. मला कृपया त्या फळ विक्रेत्याबद्दल माहिती द्या, मी त्याची नुकसान भरपाई करू इच्छिते. मला त्या गाडीवरील सर्व फळं विकत घ्यायची आहेत. ती फळं रस्त्यावर फेकणाऱ्या महिलेचंही नाव सांगा', अशी कमेंट गौहरने व्हायरल व्हिडीओवर केली. गौहरच्या या कमेंटवर अनेकांनी तिचं कौतुक केलं.

हेही वाचा: लातूरच्या बाभळगावमधील रितेशचा 'जिगरी दोस्त'! अनेक वर्षं उलटली पण..

व्हायरल व्हिडीओमागची घटना

फळ विक्रेत्याच्या गाडीचा धक्का संबंधित महिलेच्या कारला लागल्याने संतप्त झालेल्या त्या महिलेने रस्त्यावर फळं फेकण्यास सुरुवात केली. तिच्या कारवरील स्टिकरच्या आधारे महिलेची ओळख भोपाळमधील एका विद्यापीठातील प्राध्यापक म्हणून झाली आहे, परंतु तिच्या ओळखीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाची जिल्हा प्राधिकरणाकडून चौकशी केली जात असल्याची माहिती भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लावनिया यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये दिली.

गौहर ही प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री असून तिने बिग बॉसचा सातवा सिझन जिंकला होता. सध्या सुरू असलेल्या बिग बॉसच्या पंधराव्या सिझनविषयीही ती तिची मतं व्यक्त करताना दिसते. गौहरने संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबारचा मुलगा झैद दरबारशी लग्न केलं. तिने 'नागिन ३', 'गठबंधन' यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment
loading image
go to top