'कुबूल है, कुबूल है, कुबूल है' म्हणत गौहर-जैदचा निकाह संपन्न, पाहा फोटो

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 25 December 2020

गौहरने बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक इस्माइल दरबार यांचा मुलगा आणि कोरिओग्राफर जैद दरबारसोबत लग्न केलं आहे. यांचा विवाहसोहळा आज दुपारी १२ वाजता मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये पार पडला. 

मुंबई- 'बिग बॉस सिझन ७' ची विजेती आणि अभिनेत्री गौहर खान जैद दरबारसोबत लग्नबंधनात अडकली आहे. यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. गौहर आणि जैद यांची लव्हस्टोरी अखेर यशस्वीपणे पूर्ण झाली. गौहरने बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक इस्माइल दरबार यांचा मुलगा आणि कोरिओग्राफर जैद दरबारसोबत लग्न केलं आहे. यांचा विवाहसोहळा आज दुपारी १२ वाजता मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये पार पडला. 

ख्रिसमस स्पेशल: कित्येक वर्ष बॉक्स ऑफीसचा सांता राहिलेल्या आमिर खानची यावेळी मात्र पोटली रिकामी  

अभिनेत्री गौहर खानने 'बिग बॉस १४' मधून बाहेर आल्यावर लगेचच ती लग्न करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करत गौहर आणि जैदने साखरपुडा आणि लग्नाची घोषणा केली होती.

कोरोनाचं संकट पाहता या जोडीने जवळच्या आणि मोजक्याच लोकांमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील आयटीसी ग्रँड मराठा हॉटेलमध्ये मेहंदी समारंभापासून ते लग्नसोहळ्यापर्यंतचं आयोजन केलं होतं.  

गौहर आणि जैदने मेहंदी आणि आता लग्न पार पडल्यानंतर देखील मिडिया प्रतिनिधींमध्ये मिठाईचं वाटप केलं. 

गौहर उत्तम अभिनेत्री असून डान्सर देखील आहे. तर जैदचं देखील स्वतःचं युट्युब चॅनल असून तो स्वतः डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. या लग्नसोहळ्याच गौहरची बहीण निगार खान देखील दिसून आली.

जैदच्या भावा-बहीणींनी देखील या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. जैदचे सगळे भाऊ-बहीण टिकटॉक स्टार्स राहिले आहेत. गौहर आणि जैद लग्नानंतर एक वेडिंग रिसेप्शन पार्टीचं देखील आयोजन करणार आहेत. या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी दिसून येतील अशी आशा आहे.

कोरोनाच्या संकटामुळे या लग्नसोहळ्यात केवळ ५० लोक उपस्थित राहु शकले. यामध्ये अत्यंत जवळचे मित्र मैत्रीणी आणि नातेवाईक यांचाच समावेश होता. लग्नाच्या आधी प्रीवेडिंग सोहळ्यात देखील मोठ्याप्रमाणावर नाचगाण्यांचा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी गौहरचे सासरे इस्माईल दरबार यांनी त्यांच्याच 'तडप तडप' या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला.     

gauahar khan zaid darbar nikah photos gauahar khan ties knot with zaid darbar says qubool hai  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gauahar khan zaid darbar nikah photos gauahar khan ties knot with zaid darbar says qubool hai