
Gautami Patil : 'जे मला चांगलं म्हणत नाही त्यांना...' गौतमी बोलून गेली!
Gautami Patil tv entertainment celebrity dance : गौतमी पाटील हे नाव आता एव्हाना अनेकांना माहिती झालं आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्रीला जेवढं ग्लॅमर नाही तेवढं गौतमीच्या नावाला आहे. असं म्हटलं जातं. ज्या गावात गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम तिथं तरुणाईंची उसळलेली गर्दी काय सांगते हे सोशल मीडियावरुन कित्येकदा दिसून आलं आहे.
मला लावणी काय येत नाही. मी स्वताला लावणी नृत्यांगना म्हणून कधीही गवगवा केलेला नाही. माझ्या कार्यक्रमामध्ये अनेकांना अश्लीलता दिसते, ते मला त्यावरुन बोलतात, यासगळ्या प्रकारावर मी कित्येकदा माफी मागितली आहे. पण आता काहीजण ऐकत नसतील तर त्यांना मी काय म्हणू, असं म्हणत गौतमीनं आपला आक्रमकपणा दाखवून दिला आहे.
Also Read -
महिला दिनाच्या निमित्तानं गौतमीचा सत्कार करण्यात आला यावेळी तिनं मनोगतामध्ये जी भूमिका मांडली त्यावरुन तिच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर गौतमीचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिनं आपल्याला नाव ठेवणाऱ्यांना जशास तसं उत्तर दिलं आहे.
गौतमी म्हणते, मला जे चांगले म्हणतात त्यांना धन्यवाद देते. जे नाही म्हणत त्यांना बाय बाय करते. लोकांचा मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महिला दिनाच्या निमित्तानं जो माझा गौरव केला जातो त्याबद्दल मी आभारी आहे. महिलांचे प्रेम मला मिळते आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत.
यापूर्वीच्या शोमध्ये पुरुष प्रेक्षक होते. आता जो कार्यक्रम सादर केला त्याला महिला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेत मला प्रतिसाद दिला. अशी प्रतिक्रिया गौतमीनं दिली आहे.