Gautami Patil : 'तू कुंकू कुणाच्या नावानं लावतेस?' तो व्हिडिओ पाहिल्यावर प्रश्नांना उधाण

गौतमी पाटील हे नाव आता काही साधेसुधे राहिले नाही. ते चर्चेत आले आहे. त्यावरुन भलेही वेगवेगळे वाद समोर येत असले तरी गौतमीच्या नावानं तरुणाई झिंगताना, नाचताना दिसते.
Gautmi Patil Marathi Entertainment Lavni Dancer
Gautmi Patil Marathi Entertainment Lavni Danceresakal

Gautmi Patil Marathi Entertainment Lavni Dancer : राज्याच्या मनोरंजन पटावर गौतमीच्या नृत्यानं सगळ्यांना भुरळ पडली आहे. अनेकांच्या तोंडी तिचं नाव आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये गौतमीच्या नावाचा गजर आहे. तिच्या कार्यक्रमांची रेलचेल आहे. सोशल मीडियावर रिल्स व्हायरल होत आहे. व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद तुफान आहे. यासगळ्यात गौतमीच्या नव्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गौतमी पाटील हे नाव आता काही साधेसुधे राहिले नाही. ते चर्चेत आले आहे. त्यावरुन भलेही वेगवेगळे वाद समोर येत असले तरी गौतमीच्या नावानं तरुणाई झिंगताना, नाचताना दिसते आहे. तिच्या नृत्यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी आणि मिळणारा प्रतिसाद पाहून काही गावातील गावकऱ्यांनी तिचा कार्यक्रम गावात होऊ द्यायचा नाही असाही निर्णय घेतला आहे. पण यासगळ्याचा गौतमीवर काही परिणाम झालेला नाही.

Also Read -जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

असंही ऐकायला येतंय की, गौतमीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. कोणी काही का म्हणेना पण मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींना देखील मागे लोटत गौतमीनं तिच्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे. तिच्या फोटोंना, व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यात्रांचे दिवस सुरु आहेत.

यात्रेच्या निमित्तानं अनेकांना गौतमीच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. अशातच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं गौतमीच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. त्यामुळे गौतमीवर कौतूकाचा वर्षावही होतो आहे दुसरीकडे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

Gautmi Patil Marathi Entertainment Lavni Dancer
Viral Video : मद्यधुंद अवस्थेत कारवर चढून शिवीगाळ; भररस्त्यात तरूणीचा ड्रामा

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये सबसे कातील गौतमी पाटील आपल्या दिसते यावेळी तिनं केलेला डान्स चाहत्यांना आवडला आहे. मात्र यावेळी गौतमीच्या कपाळाला असलेलं कुंकू चाहत्यांना प्रश्नात टाकून गेलं आहे. अनेकांनी एवढं मोठं कुंकू कुणाच्या नावानं लावलं. असा प्रश्न विचारला आहे.

Gautmi Patil Marathi Entertainment Lavni Dancer
Kajol : काजोल एवढी सुंदर दिसते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com