रितेशच्या मुलाने दिले 'स्टार' बच्चेकंपनीला 'फिटनेस चॅलेंज'

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

याशिवाय व्हिडिओच्या शेवटी राहिल इतर बच्चेकंपनीला ही फिटनेस चॅलेंज देताना दिसतो. यात तो तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य, सैफ-करीनाचा मुलगा तैमूर, करण जोहरची मुलं रूही-यश व आर्पिती खानचा मुलगा आहिल यांना फिटनेस चॅलेंज देताना दिसतो.

फिटनेस चॅलेंज हे केवळ मोठ्यांपर्यंत मर्यादित न राहता छोटे देखिल हे फिटनेस चॅलेंज पूर्ण करताना दिसत आहेत. असाच एका सेलिब्रेटी किडचा  फिटनेस चॅलेंज व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांचा मुलगा राहिल या व्हिडिओमध्ये व्यायाम करताना दिसतोय. 

जेनेलियाने आपला मुलगा राहिल याचा फिटनेस चॅलेंजचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यात तो क्लायंबिंग करताना दिसतोय. 'बाबाने दिलेला फिटनेस चॅलेंज राहिलने स्विकारला आणि त्याने इतर बच्चेकंपनीला फिटनेस चॅलेंज दिला,' असे कॅप्शन या व्हिडिओला आहे. #BachceFitTohDeshFit हा हॅशटॅग वापरत तिने चिमुकल्या राहिलचा व्हिडिओ शेअर केला आहे.

याशिवाय व्हिडिओच्या शेवटी राहिल इतर बच्चेकंपनीला ही फिटनेस चॅलेंज देताना दिसतो. यात तो तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य, सैफ-करीनाचा मुलगा तैमूर, करण जोहरची मुलं रूही-यश व आर्पिती खानचा मुलगा आहिल यांना फिटनेस चॅलेंज देताना दिसतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: genelia deshmukh shares rahyl s fitness challenge video