जेनेलिया बर्थडे स्पेशल: मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून रितेशला टाळत होती जेनेलिया, मग अशी सुरु झाली लव्हस्टोरी..

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 5 August 2020

२००३ साली एका चुलबुल्या मुलीच्या रुपात जेनिलिया डिसूझाला पहिल्यांदा लोकांनी पडद्यावर पाहिलं. सिनेमाचं नाव होतं 'तुझे मेरी कसम'. या सिनेमात तिच्यासोबत रितेश देशमुख होता.

मुंबई- अभिनेत्री जेनेलिया डिसूजाने 'तुझे मेरी कसम' या पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक खास अशी ओळख निर्माण केली होती. जेनेलियाचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ मध्ये झाला. तिने अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न केलं. लग्नानंतर जेनेलिया सिनेमांमध्ये फार कमी दिसून आली. तिच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी जाणून घेऊया..

हे ही वाचा:  सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला 

२००३ साली एका चुलबुल्या मुलीच्या रुपात जेनिलिया डिसूझाला पहिल्यांदा लोकांनी पडद्यावर पाहिलं. सिनेमाचं नाव होतं 'तुझे मेरी कसम'. या सिनेमात तिच्यासोबत रितेश देशमुख होता. या सिनेमानंतर जेनेलियाने 'जाने तू या जाने ना', 'चांस पे डांस', 'फोर्स', 'तेरे नाल लव हो गया' यांसारखे सिनेमे केले. हिंदी व्यतिरिक्त तिने तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि मराठी सिनेमांमध्येही काम केलं.

हैदराबाद एअरपोर्टवर जेनेलिया पहिल्यांदा रितेश देशमुखला भेटली. तेव्हा रितेशचे वडिल विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जेनेलिया जेव्हा पहिल्यांदा रितेशला भेटली तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. तिला वाटत होतं की मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्या कारणाने रितेशचा स्वभाव एक दबंग स्टाईलचा असेल. या गोष्टीचा खुलासा स्वतः रितेशने एका मुलाखतीत केला होता.

सिनेमाच्या सेटवर जेव्हा दोघं भेटले तेव्हा त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. शूटींग संपल्यानंतर जेव्हा रितेश हैदराबादवरुन घरी परतला तेव्हा तो जेनेलियाला खूप मिस करायला लागला. इथुनंच दोघांमधील लव्हस्टोरीला खरी सुरुवात झाली. जेनेलियाने यानंतर रितेशसोबत 'मस्ती' या सिनेमात काम केलं. दोघांचं अफेअर पहिल्याच सिनेमापासून सुरु झालेलं मात्र मिडियाला याचा जराही पत्ता लागून दिला नाही. 

Riteish Deshmukh-Genelia D'Souza with Riaan and Rahyl

पहिल्या सिनेमानंतरच रितेश आणि जेनेलियाला साखरडपुडा करायचा होता मात्र रितेशचे वडिल विलासराव देशमुख तेव्हा तयार नव्हते असं म्हटलं जातं. जेनेलियाने रितेश चांगला मित्र आहे असं सांगून त्यांच्या अफेअरच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. २०१२ मध्ये जेव्हा दोघंही एकत्र 'तेरे नाल लव हो गया' या सिनेमात काम करायला लागले तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाची चर्चा व्हायला लागली. अखेर ३ फेब्रुवारी २०१२ ला दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. त्यांना रियान आणि राहिल अशी दोन मुलं आहेत.     

genelia dsouza birthday know love story with riteish deshmukh  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: genelia dsouza birthday know love story with riteish deshmukh