समस्त पुरुष वर्गाला जेनेलियाचा इंगा;पहा काय म्हणालीय

सोशल मीडियावर अभिनेत्रीची व्हिडीओ रील भलतीच व्हायरल होतेय
Genelia D'souza
Genelia D'souzaGoogle

जेनेलिया डिसोझा(Genelia D'souza) आणि रितेश देशमुख(Riteish Deshmukh) हे बॉलीवूडमधलं हॅप्पी कपल. दोघेही नेहमीच सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ शेअर करीत असतात. आणि हे व्हिडीओ पाहून त्यांच्या चाहत्यांची पूरती वाट लागलेली आपण सोशल मीडियावरील प्रतिक्रियांच्या माध्यमातून पाहतच असतो. कोरोनामध्ये आजूबाजूच्या वातावरणात पसरलेलं नैराश्य पाहून या दोघांनी आपल्यातील विनोदी शैलीचा वापर करीत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना हसवायचं ठरवलं. आणि त्यानंतर दिवसातून एकतरी व्हि़डीओ त्यांच्यापैकी कुणीतरी एक पोस्ट करीतच असतो. त्यांना यश मिळत गेलं अन् त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांचं मनोरंजन करणं चालू ठेवलं.

नुकतीच जेनेलियाची एक व्हिडीओ रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिनं स्त्री माहात्म्य समजावून सांगितलं आहे. ती म्हणते कशी,''स्त्रियाच घर चालवतात,दुसरं कुणी नाही''. त्याला थोडं मजेदार वळण देताना ती म्हणाली आहे,''घरच नाही,स्त्रिया नसतील तर उद्या फेसबुक,इन्स्टाग्रामही चालणं बंद होईल.'' तिच्या या व्हिडीओवर महिला चाहतावर्ग मात्र भारीच खूश झालेला दिसून .येत आहे. अनेकांनी तिला समर्थन दर्शविणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर जेनेलियानेही आपल्या व्हिडीओ रीलला कॅप्शन देताना म्हटले आहे,''है ना...'' म्हणजेच तिला विचारायचंय मी जे बोलली ते बरोबर आहे ना. अर्थात कोई शक जेनेलिया. स्त्रि आहे म्हणून केवळ घर नाही तर संपूर्ण जगाचा कारभार सुरू आहे असं म्हटलं तरी अतिश्योक्ती होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com