जेंटलमॅन सिद्धार्थ 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा हृतिक रोशनच्या "बॅंग बॅंग' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करणार, अशी चर्चा होती. पण

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा हृतिक रोशनच्या "बॅंग बॅंग' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करणार, अशी चर्चा होती. पण काही दिवसांनंतर या चित्रपटाचं "नॉट अ बॅंग बॅंग-2' या नावानं चित्रीकरण सुरू झालं होतं.

तेव्हाच स्पष्ट झालं की हा चित्रपट "बॅंग बॅंग'चा सिक्वेल नाही. काही दिवसांनंतर चित्रपटाचं नाव "रिलोड' असं ठेवण्यात आलं. आता साहजिकच नावावरून हा चित्रपट ऍक्‍शनपॅक्‍ड असणार हे निश्‍चित होतं. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर जॅकलिन फर्नांडिस काम करतेय. या दोघांची केमिस्ट्री इतकी छान जुळलीय की हा चित्रपट ऍक्‍शन नाही तर रोमॅंटिक आहे की काय, अशी शंका येऊ लागलीय.

मध्यंतरी दोघे "कॉफी विथ करण'च्या एका भागात एकत्र आले होते. तेव्हा सगळ्यांना या दोघांमधली केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. पण, खरी गंमत तर पुढेच आहे. या चित्रपटाचं नाव आता परत बदलून अखेरीस या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. या चित्रपटाचं नाव "अ जेंटलमॅन - सुंदर सुशील ऍण्ड रिस्की' असं ठेवण्यात आलंय. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात कुकरचं झाकण, अशा स्थितीत दिसतोय. त्यामुळे हा चित्रपट नेमका काय असणार याची उत्सुकता ताणली गेलीय. 

Web Title: A Gentleman posters: Sidharth Malhotra,