कोल्हापुरातील शुटींग अन्‌ "सूत्रधार'मधील पाटील...! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

"सूत्रधार' हा हिंदी चित्रपटाचे शुटींग कोल्हापूर परिसरात झाले होते. चंद्रकांत जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर, स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांच्या प्रमुख भूमिका होत्या. गिरीश कर्नाड यांनी पाटील ही व्यक्तिरेखा साकारली होती..या साऱ्या स्मृतींना आज पुन्हा उजाळा मिळाला. 

कोल्हापूर - "सूत्रधार' हा हिंदी चित्रपट. पण, चित्रपटाची कथा राजकारणावर आधारित. येथील ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. अभिनेते नाना पाटेकर, स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या आणि गिरीश कर्नाड यांनी पाटील ही व्यक्तिरेखा साकारली होती....या साऱ्या स्मृतींना आज पुन्हा उजाळा मिळाला. 

बत्तीस वर्षापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यापूर्वी एक वर्षे अगोदर म्हणजे 1985 ते 1986 या काळात ते शुटींगच्या निमित्ताने कोल्हापुरात होते. परिते, शिरसे, तुरंबे, सडोली आदी गावांत चित्रपटाचे शुटींग झाले होते. या काळात शहरात ते फारसे आले नाहीत. कारण त्यांच्या राहण्याची व्यवस्था तुळशी धरण परिसरात होती.

नाटक, साहित्य, सिनेमा अशा सर्वच प्रांतात लिलया वावरणारा हा माणूस. त्यामुळे साहजिकच फावल्या वेळेत ते प्रत्येक गोष्टीवर सविस्तर चर्चा करायचे. अगदी वीरगळींवरही त्यांचा विशेष अभ्यास होता. एखादी वीरगळ पाहिली की ते त्याच्याविषयीही भरभरून बोलायचे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Karnad memory related to Kolhapur