'गर्ल्स हाॅस्टेल'मधून उलगडणार भयाची गूढ घटना

girls hostel new serial esakal news
girls hostel new serial esakal news

मुंबई ; जेव्हा एखाद्या अनाकलनीय गूढ गोष्टीमुळे मनात धोक्याची जाणीव होते, तेव्हा अनुभवास येणारी ती भावना , आपल्या मनात एक विचित्र प्रकारचे भय निर्माण करते.  तसं पाहाल तर  हे भय बऱ्याच वेळा प्रसंगानुरूपही असते, त्यामुळे ते कोणत्या गोष्टीचं वाटेल हे काही सांगता येत नाही. भयकथा ऐकताना आजवर अनेक वेळा आपण हॉस्टेल मधील एखादी गूढ भय कथा ऐकतोच. जे स्वतः हॉस्टेल मध्ये राहतात किंवा ज्यांना हॉस्टेल मधील जीवन अनुभवलंय त्यांना असे किस्से चांगलेच माहित असतात . रात्रीच्या मित्र मैत्रिणींच्या गप्पांच्या ओघात हे किस्से आणखी रंगवुन सांगितले जातात. अशाच अनाकलनीय भयाची चाहूल सोबत घेऊन  “गर्ल्स हॉस्टेल ...  कोणीतरी आहे तिथे"  ही नवीन मालिका  , १० जुलै पासून सोमवार ते शुक्रवार रात्री १० वा. झी युवा आणत आहे  . “गर्ल्स हॉस्टेल " ही मालिका  महाराष्ट्रातील  वेगवेगळ्या छोट्या शहरांतून , मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये ,  स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी  आलेल्या ९ मुलींची आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका भयावह घटनेची गोष्ट आहे . एक अशी घटना ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच  हादरून जाते.
 
दिवसरात्र  जागणारं आणि गर्दीनं ओसंडून वाहणारं  मुंबई शहर , महिलांसाठी अजूनही म्हणावं तसं सुरक्षित नाही. अशा परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी  सारा , प्रियांका , तन्वी , मालती  , वल्लरी , ध्यानलक्ष्मी , सागरिका , नेहा  आणि वनिता  या पुणे , नाशिक , पंढरपूर , मराठवाडा अशा व इतर वेगवेगळ्या शहरांतून  आलेल्या  मुली सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये  एकमेकींच्या सानिध्यात रूममेट्स म्हणून , धमाल मस्ती आणि  लुटुपुटीची भांडण करूनसुद्धा मजेत राहत आहेत. रोजच्या आयुष्यातील संघर्ष करत असतानाच  होस्टेलच्या  भिंतीच्या  आत मात्र त्यांना प्रचंड सुरक्षित वाटते. सावित्री गर्ल्स हॉस्टेल मधील या मुलींना  सगळ्यात मोठा आधार आहे तो एकमेकींचा,  एकमेकांबरोबर असण्याचा , आणि त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात सुरक्षित हक्काची जागा आहे, त्यांचे सावित्री गर्ल्स हॉस्टेल . याच त्यांच्या सावित्री गर्ल्स हॉस्टेल च्या सुरक्षित जगात अतिशय भयानक घटना घडते ज्यामुळे या मुलींच्या आयुष्यातील धमाल मस्ती संपून  त्याची जागा  थरकाप उडवणारे भय घेते .गूढ घटनांची साखळी वाढू लागते आणि त्यानंतर सुरु होतं एक अनाकलनीय प्रसंगांचं भयंकर चक्र ! या सर्व मुली एक एक करून  या चक्रात गुरफूटल्या जातात.  प्रत्येकवेळी कोणीतरी आहे तिथे ही भावना बळावू लागून हॉस्टेलमध्ये एक भीतीच सावट पसरू लागत . झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड  या मालिकेनिमित्त बोलताना म्हणाले , " भय, गूढ, थरार आणि साहसाचे , मानवी मनाला नेहमीच आकर्षण वाटत असते.  

ही उत्कंठा आणि रहस्ये काही कथा – कादंबऱ्या त्याचप्रमाणे अनेक सिनमे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. अशा कथा अनुभवताना  ‘पुढे काय?’ हा प्रश्न  आपल्याला मनात सतावत असतो हाच अनुभव झी युवाची नवीन मालिका “गर्ल्स हॉस्टेल.... कोणीतरी आहे तिथे " देणार आहे. झी युवा हा एक नवीन प्रयोग पहिल्यांदाच करीत आहे  प्रेक्षकांच्या मनातील भीती " खरंच कोणी आहे का तिथे ?" ह्या भावनेचा आधार घेत  प्रेक्षकांना थरार, रहस्य, उत्कंठा, भय, गूढ  ह्याची अनुभूती देणारी एक उत्कृष्ट मालिका पहायला  मिळेल."
 
झी युवा ही वाहिनी, नवोदित तरुण कलाकारांच्या अभिनय गुणांना नेहमीच वाव देते . या मालिकेत सुद्धा सर्वच नवोदित कलाकारांना संधी दिली आहे . या कलाकारांचं छोट्या पडद्यावरचं पदार्पण असलं तरी विविध नाटकांमधील भूमिकांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी यातली प्रत्येक व्यकिरेखा सशक्तपणे साकारली आहे. या मालिकेची कथा प्रसिद्ध लेखक शेखर ढवळीकर आणि पटकथा अभिनेता लेखक चिन्मय मांडलेकर यांची आहे तर संवाद कुमुद इतराज यांचे आहेत. “सोमिल क्रिएशन”ची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे.  "गर्ल्स हॉस्टेल ‘कोणीतरी आहे तिथे ...” येत्या १० जुलै पासून  सोमवार ते शुक्रवार रात्री १० वा. झी युवावरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com