'रामायणा'त सीताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

रामायण मालिका म्हटलं की या मालिकेतील अनेक पात्र डोळ्यांसमोर उभी राहतात. त्यातीलच एक पात्र म्हणजे सीता. या मालिकेमध्ये सीताची भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलिया हिने साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन दादही दिली. आता ही अभिनेत्री 54 वर्षांची आहे.

मुंबई- रामायण ही मालिका साऱ्यांना आठवतच असेल...छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय मालिका प्रेक्षक एकत्र बसून पाहायचे. या मालिकेकडे प्रेक्षकांचे विशेष आकर्षण होतं. आता या मालिकेबाबत आनंदाची बातमी आहे. ही मालिका डीडी नॅशनल वाहिनीवर प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. कोरोनाचा वाढता पसारा पाहता संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे घरात बसून विरंगुळा काय? असा प्रश्न संपूर्ण जनतेच्या डोळ्यासमोर असताना रामायण ही मालिका पुन्हा एकदा दाखवण्यात यावी अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत होती. आता 'रामायण' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

हे ही वाचा: मराठीत बोल असं चाहत्याने म्हटल्यावर 'या' अभिनेत्याचा चढला पारा 

रामायण मालिका म्हटलं की या मालिकेतील अनेक पात्र डोळ्यांसमोर उभी राहतात. त्यातीलच एक पात्र म्हणजे सीता. या मालिकेमध्ये सीताची भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलिया हिने साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन दादही दिली. आता ही अभिनेत्री 54 वर्षांची आहे.

Remember Deepika Chikhalia Who Played Sita in Ramayan? This is ...

मात्र वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही ती तितकीच ग्लॅमरस आणि फिट आहे. सोशल मीडिया अकाऊंद्वारे दीपिका तिच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. वयाच्या 54 वर्षातही तिचा ग्लॅमरस लूक पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

In the wake of the Corona crises, our PM has asked us to observe voluntary Janta Curfew on this Sunday the 22nd March from 7 AM to 9 PM for 14 hours. It’s a welcome move and I support it wholeheartedly. This move is because the people in India have not taken this problem seriously enough and all are going about their routine life as if we all are immune to this and nothing will happen to us. People need to stop socializing and stop standing at the paan shops and meeting at coffee shops. Self isolation and quarantine means staying at home and home alone with just your family. Social distancing means physically keep away from gatherings and does not mean that you have to impose emotional distancing on yourself. Make use of this time to spend it with your family, pursue your hobbies at home, exercise, clean your house, cook your favorite food, mediate ......the list is endless. Discover yourself and invest in yourself and your family look inwards and internally ,treat this time wisely and productively. Something can be benefited even in chaos. Value your life and show respect and care for others too #care#safe#carona#stay#home#elders#children#isolation#nopanic #future#covind19

A post shared by Dipika (@dipikachikhliatopiwala) on

दीपिकाने बऱ्याच हिंदी चित्रपटातही काम केल आहे. 'खुदाई', 'सुन मेरी लैला', 'चीख' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बाला' चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटात तिने अभिनेत्री यामी गौतमीच्या आईची भूमिका साकारली होती.

Deepika Chikhalia - IMDb

दीपिका खरं तर रामायणामुळे घराघरांत पोहचली. सिता या भूमिकेने तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळवून दिली. 

glamorous look of actress deepika chikhaliya who played seeta in ramayana


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: glamorous look of actress deepika chikhaliya who played seeta in ramayana