'फिल्मफेअर 2019' मध्ये रंगला प्रेमाचा सोहळा; 'हे' ठरले मानकरी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 March 2019

  • आलियाने रणबीर कपूरला चक्क स्टेजवरुन म्हटले 'आय लव्ह यू' 
  • आलिया-रणबीर दोघेही बेस्ट अॅक्टर्स!
  • 'राझी', 'अंधाधुन', 'बधाई हो', 'संजू', 'पद्मावत' मध्ये झाली चुरस 

फिल्मफेअर अवॉर्ड हा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्याची वाट चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार बघत असतो. हा सोहळा नुकताच पार पडला. मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या 'फिल्मफेअर अवॉर्ड 2019' या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळींनी हजेरी लावली. प्रत्येकाचा अंदाज आणि अदा सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

चित्रपटसृष्टीतील अदाकारांचा ग्लॅमरस अंदाज विशेषतः अशा पुरस्कार सोहळ्यांमध्ये पहायला मिळतो. अनेक चित्रपट, दिग्दर्शक, कलाकार यांना यावेळी फिल्मफेअरने सन्मानित करण्यात आले. यावर्षीच्या सोहळ्यात विशेष आकर्षण ठरली ती म्हणजे आलिया भट आणि रणबीर कपूर ही जोडी. या दोघांच्या अफेअरची चर्चा होत असतानात या सोहळ्यात आलियाने रणबीर कपूरला चक्क स्टेजवरुन 'आय लव्ह यू' म्हटले. त्यानंतर काहिसे लाजत रणबीरने आपला चेहराही छाकला. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या वर्षी आलिया-रणबीर दोघांनाही बेस्ट अॅक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

 

 
 

तसेच या सोहळ्यात 'राझी', 'अंधाधुन', 'बधाई हो', 'संजू', 'पद्मावत' या चित्रपटांमध्ये चुरस बघायला मिळाली. 'राझी'ने उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकाविला. आणखी कोण ठरले 'फिल्मफेअर अवॉर्ड 2019'चे मानकरी पाहुयात...

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : मेघना गुलजार (स्त्री)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) : अंधाधुन
सर्वोत्कृष्ट अभिनेता : रणबीर कपूर (संजू)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) : रणवीर सिंग (पद्मावत), आयुष्मान खुराणा (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अलिया भट (राझी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) : नीना गुप्ता (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता : गजराज राव (बधाई हो), विकी कौशल (संजू)
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री : सुरेखा सिक्री (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) : ईशान खट्टर
सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री) : सारा अली खान
सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक) : अमन कौशिक (स्त्री)
सर्वोत्कृष्ट गायक : अर्जित सिंग (ए वतन-राझी)
सर्वोत्कृष्ट गायिका : श्रेया घोषाल (घुमर-पद्मावत)
सर्वोत्कृष्ट गीतकार : ऐ वतन (गुलजार-राझी)
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम : पद्मावत (संजय लीला भन्साळी)
सर्वोत्कृष्ट कथा : मुल्क (अनुभव सिन्हा)
सर्वोत्कृष्ट पटकथा : अंधाधुन (श्रीराम राघवन, अर्जित बिस्वास, पूजा सुरती, योगेश चांदेकर, हेमंत राव)
सर्वोत्कृष्ट संवाद : बधाई हो (अक्षत घिलडील)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग : पूजा सुरती (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन : विक्रम दहीया आणि सुनील रॉड्रीक्स (मुक्काबाज)
सर्वोत्कृष्ट बॅकराऊंड स्कोर : अंधाधुन (डॅनियल. बी. जॉर्ज)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी : कृती महेश मिड्या, ज्योती डी तोमर (घुमर-पद्मावत)
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी : पंकज कुमार (तुंबाड)
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन : नितीन झियानी चौधरी, राकेश यादव (तुंबाड)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन : कुणाल शर्मा (तुंबाड)
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स : रेड चिलीज (झीरो)

filmfare1

filmfare2

filmfare3

filmfare4

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: glamour and winners list of filmfare award 2019