'गणरंग'चे 'तोच परत आलाय' लवकरच रंगमंचावर

टीम इ सकाळ
सोमवार, 3 जुलै 2017

अभिनेत्री, कथा अरुणाची, वन रुम किचन, तुमचा मुलगा करतोय काय, , रानभूल, कुसुम मनोहर लेले, कमळीच झाल काय?, , ....आणि अनेक... अनेक ... प्रत्येक नाटकाचा आशय वेगळा, विषय हटके.. ही गणरंगची ओळख. विनय आपटे यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक या नाट्यसंस्थेला मोठे केले. पण गणरंग आता पुन्हा, तिच्या परंपरेला साजेस नव नाटक लोकांसमोर आणत आहे.

मुंबई : अभिनेत्री, कथा अरुणाची, वन रुम किचन, तुमचा मुलगा करतोय काय, , रानभूल, कुसुम मनोहर लेले, कमळीच झाल काय?, , ....आणि अनेक... अनेक ... प्रत्येक नाटकाचा आशय वेगळा, विषय हटके.. ही गणरंगची ओळख. विनय आपटे यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक या नाट्यसंस्थेला मोठे केले. पण गणरंग आता पुन्हा, तिच्या परंपरेला साजेस नव नाटक लोकांसमोर आणत आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधाराने समाज प्रगत होत जातो. पण कोणत्याही स्वरुपाची प्रगती नवे प्रश्न निर्माण करते. यात काही व्यक्तींच्या विकासाला वाव मिळतो तर काही माणसांना त्याची किंमत मोजावी लागते. ‘तोच परत आलाय’ हे आयवीएफ तंत्रानं साधलेली प्रगती आणि त्यातून निर्माण झालेला गुंता मांडणारं आजच्या काळातलं नवं कोरं नाटक आहे.

मेडीकल व्यवसाय जो देवत्वाच्या ठिकाणी मानला जातो त्या व्यवसायानं पाहता पाहता एक उग्र स्वरुप धारण केलं आहे. कळत नकळत एका भावनीक निर्णयावरुन सुरु होऊन व्यवसायीकतेच्या सर्व सीमा पार करु इच्छिणाऱ्या एका डॉक्टरच्या इच्छा आकांक्षांचा प्रवास या नाटकात चितारला आहे.

नाटकात एकाच वेळी तीन बाप एकाच मुलावर आपला हक्क सांगू पाहतात. आपलं म्हणणं आपापल्या परिने सिध्द करण्याच्या हिकमतीतून नवनव्या गोष्टी उलगडत जातात. एक चूक पचली की माणूस दुसरी चूक करायला धजावतो आणि नंतर त्या चुकांचं त्याला काही वाटेनासं होतं. आपला नवरा काहीतरी चुकीचं करतो आहे, तो कुठल्यातरी चुकीच्या माणसांच्या गटात सामील आहे याचा अंदाज असून देखील हतबल असणाऱ्या स्रीची ही कहाणी आहे. इच्छा आणि मार्ग दिसत असूनही ती काही करु शकत नाही. 

एका बाजूला सतत बदलत चाललेला समाज, त्यातून निर्माण झालेले प्रश्न, त्या सोडवण्यासाठी तयार होत असलेली यंत्रणा, यातून निर्माण होणाऱ्या संधी आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली हाव या सर्वांवर हे नाटक भाष्य करतं.

Web Title: Gnarang Vinay apte new drama esakal news