"गो गोवा गॉन'चा सिक्वेल? 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

अभिनेता सैफ अली खान, वीर दास आणि कुणाल खेमू यांच्यावर चित्रित झालेला विनोदी थरारपट "गो गोवा गॉन' बॉक्‍स ऑफिसवर अयशस्वी ठरला; मात्र हा चित्रपट तरुण पिढीला चांगलाच भावला होता. या चित्रपटाची निर्मिती सैफने केली होती. हा चित्रपट त्याच्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटातील सैफची भूमिकादेखील वेगळी होती. त्यामुळे सैफ आता या चित्रपटाचा सिक्वेल बनवणार असल्याचे समजते आहे. तेच कलाकार आणि क्रिष्णा डीके व राज निदीमोरू या दिग्दर्शक जोडीसोबत "गो गोवा गॉन'च्या सिक्वेलची निर्मिती करणार आहेत. यातही सैफ निर्मितीसोबत अभिनय करताना दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: go goa gone sequel