परिणीतीची सेटवरची मजा

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

"गोलमाल अगेन'ची टीम जोरदार शूटिंगमध्ये बिझी आहे; पण "गोलमाल अगेन'ची हिरोईन परिणीती चोप्रा सध्या तिच्या आगामी "मेरी प्यारी बिंदू' चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही बिझी आहे.

गोलमाल अगेनच्या सेटवर परिणीती आपल्या सहकलाकारांबरोबर शूटिंग करत असतानाच त्यांनी परिणीतीबरोबर नुकताच एक प्रॅंक केला. तिच्या आगामी "मेरी प्यारी बिंदू' या चित्रपटाचे त्यांनी अनोख्या प्रकारे प्रमोशन करत तिची खिल्ली उडवली.

त्याचं झालं असं की, परिणीतीचे या चित्रपटातील नाव बिंदू आहे तर "गोलमाल अगेन' या चित्रपटातील कलाकार अजय देवगण, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, अर्शद वारसी, कुणाल खेमू यांनी अभिनेत्री बिंदूचे भले मोठे पोस्टर आणले होते आणि परिणीतीला बाजूला करून त्यांनी त्या पोस्टरबरोबरच फोटो काढायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सेटवर परिणीतीची खूप खिल्ली उडवली आणि खूप मजा केली. 

Web Title: golmaal again, golmaal 4, parineeti chopra, meri pyaari bindu, ajay devgn,