"गोलमाल अगेन'मध्ये प्रकाश राज 

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता प्रकाश राज हा रोहित शेट्टी दिग्दर्शित "गोलमाल' चित्रपटाच्या पुढील भागात दिसणार आहे. यापूर्वी रोहित व प्रकाश यांनी "सिंघम'मध्ये काम केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाश व अजय देवगण पुन्हा एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटात प्रकाश खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. याबाबत तो म्हणाला, "मला आणि रोहितला बऱ्याच दिवसांपासून एकत्र काम करायचे होते. एक महिन्यापूर्वी मला "गोलमाल अगेन'मध्ये काम करण्याबाबत विचारण्यात आले. चित्रपटाची पटकथा खूप छान असून माझी भूमिका मजेदार आहे. पुन्हा अजय देवगणसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.' 

Web Title: Golmaal again movie prakash raj enter