तब्बूची गोलमाल फॅमिलीमध्ये एन्ट्री 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

रोहित शेट्टीच्या "गोलमाल' सिरीजमधला नवीन चित्रपट येणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेलेच होते. त्यातही सगळ्यात मोठी उत्सुकता होती की या चित्रपटाची नायिका कोण असणार? याच्या बातम्या येत होत्या; पण "मकबूल', "चांदनी बार', "हैदर", "चिनी कम' अशा चित्रपटांतून त्या भूमिकेशी समरस होऊन अभिनय करणारी अभिनेत्री तब्बू रोहित शेट्टीच्या गोलमाल फॅमिलीत एन्ट्री करणारेय. तिच्याबरोबर अजय देवगण, अर्शद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, परिणिती चोप्रा या चित्रपटात असणार आहेत. परिणितीही या परिवाराची नवीन सदस्य आहे. गोलमाल सिरीज विनोदी चित्रपटांमधील सगळ्यात हिट ठरलेली सिरीज आहे.

रोहित शेट्टीच्या "गोलमाल' सिरीजमधला नवीन चित्रपट येणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेलेच होते. त्यातही सगळ्यात मोठी उत्सुकता होती की या चित्रपटाची नायिका कोण असणार? याच्या बातम्या येत होत्या; पण "मकबूल', "चांदनी बार', "हैदर", "चिनी कम' अशा चित्रपटांतून त्या भूमिकेशी समरस होऊन अभिनय करणारी अभिनेत्री तब्बू रोहित शेट्टीच्या गोलमाल फॅमिलीत एन्ट्री करणारेय. तिच्याबरोबर अजय देवगण, अर्शद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, परिणिती चोप्रा या चित्रपटात असणार आहेत. परिणितीही या परिवाराची नवीन सदस्य आहे. गोलमाल सिरीज विनोदी चित्रपटांमधील सगळ्यात हिट ठरलेली सिरीज आहे. हैदरनंतर आता तब्बू गोलमाल 4 मध्ये मोठ्या पडद्यावर एन्ट्री करतेय. तिला गोलमालमधील भूमिकेत बघायला तिचे चाहते नक्कीच उत्सुक असतील. 

Web Title: Golmaal Again: Tabu joins Ajay Devgn’s comedy film