'गोलमाल अगेन'मध्ये तुषार कपूर बोलणार!

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई : रोहित शेट्टीचा गोलमाल या दिवाळीत येण्यासाठी आता सज्ज झाला आहे. गोलमालचा हा चौथा भाग असेल. या चित्रपटाचा कलरफुल ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर यावेळच्या गोलमाल अगेनमध्ये लिंबू मिरची का बांधली आहे ते कळतं. आणि यातली सगळ्यात हिट गोष्ट अशी आहे की गेल्या तीन भागात मुक्याचा अभिनय करणारा तुषार कपूर या भागात बोलताना दिसणार आहे. 

हा ट्रेलर नीट पाहिल्यानंतर लक्षात येते की गेल्या चार भागात केवळ हातवारे करून हसवणारा तुषार कपूर या भागात काही संवादही म्हणणार आहे. बाकी यात मॅड काॅमेडी ठासून भरली असेल यात शंका नाही. 

गोलमालचा ट्रेलर इथे पहा

या ट्रेलरमध्येही टिपिकल रोहित शेट्टी स्टाईल गाड्यांची उडवाउडवी आहे. गाणी आहेत, काॅमेडीचा त़डका तर आहेच शिवाय अॅक्शनही असणार आहे. परिणिती चोप्रा आणि तब्बू ही दोन नायिका या निमित्ताने या मंडळींमध्ये सामील झालेल्या दिसणार आहेत. अजय देवगण, आर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू यामंडळींसह जाॅनी लिव्हर, सचिन खेडेकर आदी मंडळीही या चित्रपटात दिसणार आहेत.  

Web Title: golmaal again trailer released esakal news