‘इपितर’ चित्रपटाच्या गाण्यांना मिळतोय भरघोस प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

सिनेमाच्या ऑडीओ ज्युकबॉक्सला दोन दिवसात 12 हजार व्ह्युज मिळाले आहे. नुकताच 'हलव हलव अंगाला' या गाण्याचा व्हिडीओ सुध्दा रिलीज झाला आहे

'इपितर' सिनेमाविषयी त्याच्या फस्ट लूक पोस्टरवरुन प्रचंड उत्सूकता होती. सिनेमाच्या नावात जसे वेगळेपण आहे, तसेच वेगळेपण सिनेमाच्या संगीतामध्ये आहे. सिनेमाच्या संगीत युट्यूबवर येताच संगीताला मिळणाऱ्या रसिकांच्या प्रतिसादावरुन जनमानसात लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.

सिनेमाच्या ऑडीओ ज्युकबॉक्सला दोन दिवसात 12 हजार व्ह्युज मिळाले आहे. नुकताच 'हलव हलव अंगाला' या गाण्याचा व्हिडीओ सुध्दा रिलीज झाला आहे. या गाण्यालाही एका दिवसात 36 हजारावर व्ह्युज् मिळाले आहे. सिनामाचे निर्माते आणि लेखक किरण बेरड यांनी 'हलव हलव अंगाला' हे गाणे लिहीले आहे तर जयभीम शिंदे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. आदर्श शिंदे यांचा आवाज गाण्याला लाभला आहे.

Ippitar marathi movie

आदर्श शिंदे या गाण्याविषयी सांगतात, 'ग्रामीण बाजाचं हे गाणं आहे. वरातीतलं गाणं मी पहिल्यांदाच गायलं आहे. मला विश्वास आहे की यंदाच्या गावकडच्या सगळ्या वरातीत हे गाणं वाजेल.' 'इपितर' सिनेमा येत्या 8 जूनला प्रदर्शित होणार आहे.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good Response From Public to songs of Ippitar marathi movie