गुगलने ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांच्या आठवणीत 'या' खास कारणासाठी डुडलच्या माध्यमातून दिला सन्मान

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 29 September 2020

जोहरा सेहगल या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या ज्यांना आंतराराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली होती. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी जोहरा सेहगल यांचा नीचा नगर सिनेमा १९४६ साली कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रिलीज झाला होता.

मुंबई- भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जोहरा सेहगल यांचा गुगलने डूडलच्या माध्यमातून सन्मान केला आहे. गुगलने सेलिब्रिटींग जोहरा सेहगल नावाने डुडल बनवलं आहे. जोहरा सेहगल या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या ज्यांना आंतराराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली होती. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी जोहरा सेहगल यांचा 'नीचा नगर' सिनेमा १९४६ साली कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने कान्स फिल्म फेस्टिवलचा सगळ्यात मोठा पुरस्कार पाल्मे डी ओर मिळवला होता. जोहरा सेहगल यांचं हे डुडल खूपंच कमाल आहे.  

हे ही वाचा: "तु ह्या लढाईत एकटी नाहीस" म्हणत पायल घोषला शर्लिन चोप्रा आणि कंगना रनौतचा पाठिंबा

साहिबजादी जोहरा सेहगल मुमताज उल्ला खान यांचा जन्म २७ एप्रिल १९१२ मध्ये उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे झाला. त्यांनी त्यांचं शिक्षण जर्मनीमधून पूर्ण केलं. त्यानंतर भारतीय नृत्य कलाकार उदय शंकर यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर डान्ससाठी अनेक दौरे केले. भारतात आल्यानंतर १९४५ मध्ये 'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन'शी जोडल्या गेल्या. भारतीय सिनेमातील योगदानासाठी जोहरा  सेहगल यांना सरकार तर्फे १९९८ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने, २००१ मध्ये 'कालीदास' सन्मानाने आणि २०१० मध्ये 'पद्म विभुषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

6aq0g9h8

१० जुलै २०१४ साली वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या डान्स आणि अभिनयासाठी आजही त्यांना ओळखलं जातं. जोहरा सेहगल यांना टीव्ही सिरिअल 'मुल्ला नसीरुद्दीन' मधील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांला ओळखलं जातं. त्या अभिनय क्षेत्रात माहिर होत्या आणि पडद्यावर आल्यावर उठुन दिसायच्या.   

google doodle celebrates zohra sehgal neecha nagar released on september 29 in 1946 at the cannes film festival  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: google doodle celebrates zohra sehgal neecha nagar released on september 29 in 1946 at the cannes film festival