हिंदी चित्रपटसृष्टीतील 'मोगॅम्बो'ला गुगल डुडलची मानवंदना!

टीम ईसकाळ
Saturday, 22 June 2019

हिंदी चित्रपटसृष्टीतील 'मोगॅम्बो' अमरिश पुरी यांचा आज 87वा जन्मदिन! त्यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलने एक खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील 'मोगॅम्बो' अमरिश पुरी यांचा आज 87वा जन्मदिन! त्यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलने एक खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. त्यांचा चढा आवाज, भारदस्त व्यक्तिमत्व आणि उत्तम अभिनय कौशल्य यांमुळे त्यांनी विविध भूमिका रंगवल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

Related image

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मधले बाबूजी असो किंवा 'नायक'मधील मुख्यमंत्री, 'नगिना'मधील भैरवनाथ असो की 'मिस्टर इंडिया'मधील मोगॅम्बो, सर्व भूमिकांमध्ये शिरून त्यांनी त्या जगवल्या. 'खलनायक' काय असतो, ते त्यांनी सर्वांना दाखवून दिले. त्यामुळे हिंदी चित्रपट आणि अमरिश पुरींचा खलनायक हे समीकरण ठरलेलं असायचं. त्यांनी हिंदीसह मराठी, पंजाबी, कन्नड, इंग्रजी, मल्याळम, तमिळ चित्रपटांमध्येही काम केले. 

Image result for nayak amrish puri

त्यांचा जन्म 22 जून 1932 मध्ये पंजाबमधील नवाशहर येथे झाला. पुढे त्यांनी अभिनेता म्हणून वाटचाल सुरू केली आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर ते पोहोचले. आजचे गुगल डुडल आवर्जून बघा आणि एका महान नायकाला आठवणीत ठेवा.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google doodle honors Amrish Puri on His Birth Anniversary