गोविंदा-रविना पुन्हा थिरकणार 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

नव्वदच्या दशकातील बॉलीवूडमधील लोकप्रिय ठरलेली जोडी अभिनेता गोविंदा आणि रविना टंडन पुन्हा थिरकताना दिसणार आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर त्यांचे दिलखेचक नृत्य पाहायला मिळणार आहेत. झी सिने पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर त्यांची ही धूम पाहण्याची संधी मिळेल. मंचावर सुरुवातीला हे दोघे वेगवेगळी एन्ट्री करणार आहेत. नंतर ही जोडी अँखियों से गोली मारे, क्‍या लगती है हाए रब्बा, कुर्ता फाड के या गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत. लडकी ब्युटिफूल कर गई चुल्ल यावरदेखील नृत्य करणार आहेत.

नव्वदच्या दशकातील बॉलीवूडमधील लोकप्रिय ठरलेली जोडी अभिनेता गोविंदा आणि रविना टंडन पुन्हा थिरकताना दिसणार आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर त्यांचे दिलखेचक नृत्य पाहायला मिळणार आहेत. झी सिने पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर त्यांची ही धूम पाहण्याची संधी मिळेल. मंचावर सुरुवातीला हे दोघे वेगवेगळी एन्ट्री करणार आहेत. नंतर ही जोडी अँखियों से गोली मारे, क्‍या लगती है हाए रब्बा, कुर्ता फाड के या गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत. लडकी ब्युटिफूल कर गई चुल्ल यावरदेखील नृत्य करणार आहेत. याबाबत गोविंदा म्हणाला की, रविनासोबत पुन्हा नृत्य करताना खूप आनंददायी आहे, तर रविनाने सांगितले की, चीचीबरोबर नृत्य करणे हे भाग्यच आहे. 

Web Title: govinda and raveena dance in zeecine award