दहा वर्षानंतर.. राजू फिर से बन जाएगा जंटलमन!

मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

जवळपास 10 वर्षांपूर्वी भरतातल्या घराघरांत स्टॅड अप काॅमडी पोचली. त्यावेळी राजू श्रीवास्तव हे नाव लोकांना समजलं. त्या स्पर्धेत त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं खरं. पण त्यानंतर मात्र त्यांची गाडी सुसाट सुटली. राजू श्रीवास्तव हे नाव घराघरात पोचलं. आजही ते अनेक ठिकाणी आपले शो करत असतात. करंट अफेअर्सची उत्तम जाण असणारा विनोदी कलाकार अशा आशयाची अनेक बक्षिसं त्यांनी मिळवली आहेत. आता हाच कलाकार पुन्हा येतो आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये राजू पुन्हा एकदा येणार आहेत. विशेष बाब अशी की दहा वर्षांनंतर ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर चमकणार आहेत. 

मुंबई : जवळपास 10 वर्षांपूर्वी भरतातल्या घराघरांत स्टॅड अप काॅमडी पोचली. त्यावेळी राजू श्रीवास्तव हे नाव लोकांना समजलं. त्या स्पर्धेत त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं खरं. पण त्यानंतर मात्र त्यांची गाडी सुसाट सुटली. राजू श्रीवास्तव हे नाव घराघरात पोचलं. आजही ते अनेक ठिकाणी आपले शो करत असतात. करंट अफेअर्सची उत्तम जाण असणारा विनोदी कलाकार अशा आशयाची अनेक बक्षिसं त्यांनी मिळवली आहेत. आता हाच कलाकार पुन्हा येतो आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये राजू पुन्हा एकदा येणार आहेत. विशेष बाब अशी की दहा वर्षांनंतर ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर चमकणार आहेत. 

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोलाही पुन्हा एकदा टीआरपीमध्ये येण्याची गरज वाटू लागली आहे. म्हणूनच आता आगामी शोमध्ये खूप नवे आणि त्याचसोबत काहीतरी भन्नाट आणण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. म्हणूनच या शोचा परीक्षक म्हणून अक्षयकुमारची निवड करण्यात आली आहे. मोठे, जुने जाणते परीक्षक आणि नावाजलेले स्टॅंडअप काॅमेडिअन्स असं या शोचं स्वरूप असणार आहे. आता श्रीवास्तव येऊन नेमकं काय करणार, नेमक्या कोणत्या राऊंडमध्ये त्यांना प्रवेश मिळणार आहे, ते लवकरच कळेल. 

Web Title: the great indian laughter challenge esakal news

टॅग्स