'आडवा होईपर्यंत व्यायाम करून साजरा केला पाडवा'..'वेडात मराठे वीर..' च्या टीमचं हटके सेलिब्रेशनGudhi Padwa 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gudhi Padwa 2023 Celebration- Vedat Marathe Veer Daudale Saat

Gudhi Padwa 2023: 'आडवा होईपर्यंत व्यायाम करून साजरा केला पाडवा'..'वेडात मराठे वीर..' च्या टीमचं हटके सेलिब्रेशन

Gudhipadwa 2023: महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाची जेव्हापासून घोषणा झाली आहे तेव्हापासून हा सिनेमा कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असलेला पहायला मिळतो आहे.

सुरुवातीला तर सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अक्षय कुमार साकारणार म्हणून लोकांनी नाराजी व्यक्त केली. नंतर सिनेमात सत्या मांजरेकरला महाराजांचा मावळा बनवणं अनेकांना पटलं नाही. अलिकडेच सिनेमाच्या सेटवर झालेला अपघात आणि लगेच नंतर टीमचं कोल्हापूरात ज्योतिबा दर्शन आणि जमिनीवर बसून जेवणाच्या पंगतीचा आनंद घेणं एक ना अनेक कारणांनी सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

आता गुढीपाडव्याच्या निमित्तानं 'वेडात मराठे वीर दौडले सात' च्या टीमनं केलेलं हटके सेलिब्रेशन सोशल मीडियावर गाजत आहे. (Gudhi Padwa 2023 Celebration-Marathi Movie Vedat Marathe Veer Daudale Saat)

वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची टीम सध्या कोल्हापुरात आहे..सिनेमाच्या शूटिंगसाठी. तिथनंच त्यांनी पाडवा सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या टीमनं जीममध्ये वर्कआऊट केल्यानंतर पाडव्या निमित्तानं खास फोटो शूट केलं आणि ते फोटो शेअर करत चाहत्यांना पाडव्याच्या शुभेच्छा देत पोस्टला कॅप्शन दिलं की,'आडवा होई पर्यन्त व्यायाम करून साजरा केला पाडवा'...आता या हटके पद्धतीनं पाडवा साजरा करणाऱ्या 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या टीमचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायत. आणि लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

वेडात मराठे वीरल दौडले सात सिनेमातील अभिनेता विराट मडकेनं हे फोटो गुढीपाडव्याच्या निमित्तानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. य़ा फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या सिनेमात सिद्धार्थ जाधव,विशाल निकम, विराट मडके,जय दुधाणे,डॉ.उत्कर्ष शिंदे,हार्दिक जोशी,प्रविण तरडे,आरोह वेलणकर असे कलाकार आहेत.