'सगळ्यांना ऑस्कर ट्रॉफीसोबत फोटो हवाय, माझ्याबरोबर नाही!' गुनीत मोंगांच्या डोळ्यात पाणी | Oscar Winner Guneet Monga | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscar Winner Guneet Monga

Oscar Winner Guneet Monga : 'सगळ्यांना ऑस्कर ट्रॉफीसोबत फोटो हवाय, माझ्याबरोबर नाही!' गुनीत मोंगांच्या डोळ्यात पाणी

Guneet Monga reveals everyone wants to take photos : भारतीय चित्रपट विश्वासाठी यंदाचे वर्ष मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे असल्याचे दिसून आले. एस एस राजामौली यांच्या आरआरआऱ चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला सर्वोत्तम गाण्याचे ऑस्कर मिळाले तर गुनीत मोंगा यांच्या द एलिफंट व्हिस्पर्स नावाच्या माहितीपटाला सर्वोत्तम डॉक्यमेंट्रीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. त्यातील गुनीत मोंगा यांच्या एका प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गुनीत मोंगा यांना आणि त्यांच्या टीमला ऑस्कर मिळाल्यानंतर देशातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव झाला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावले होते. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुनीत मोंगा आणि त्यांच्या टीमचे केवळ भारतच नाही तर जगभरातून कौतूक झाले. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यासगळ्यात मोंगा यांनी एका गोष्टीबाबत खंत व्यक्त केली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मोंगा आपल्या एका मुलाखतीमध्ये म्हणतात की, लोकांना ऑस्कर आणि ऑस्करच्या ट्रॉफीचे खूप कौतूक असते. भारताला दीड दशकांच्या कालावधीनंतर ऑस्कर मिळाला आहे. याचा आनंद मोठा आहे. प्रेक्षकांचा, चाहत्यांचा आनंद मी समजू शकते. पण सगळ्यांना फक्त ऑस्करचे कौतूक आहे.

ज्याच्यामुळे मिळाला त्याचे नाही. याचे मला आश्चर्य वाटते. आणि या गोष्टीची खंतही वाटते. अनेक जण फोटो काढण्याची विनंती करतात पण तो फोटो माझ्यासाठी नसून त्या ट्रॉफीसाठी असतो. अशा शब्दांत मोंगा यांनी खंत व्यक्त केली आहे.

ऑस्कर मिळाल्यानंतर मोंगा यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून सत्कार समारंभाचे फोन येतात. सगळ्याच कार्यक्रमांचा स्विकार करणे मोंगा यांना शक्य होत नाही. मात्र ज्याठिकाणी जातात तेव्हा त्यांच्याबाबत तो प्रसंग घडतो असे त्यांनी एका मुलाखतीच्या निमित्तानं दिसून आले आहे.