Gurmeet Debina : मुलं होऊ देण्यावर गुरमीतची परखड प्रतिक्रिया, जेव्हा माझी...

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध जोडपं म्हणजे गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) आणि देबीना बॅनर्जी (Debina Bonnerjee) यांची वेगळी क्रेझ आहे.
Gurmeet Chaudhary
Gurmeet Chaudhary esakal

TV Entertainment News: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध जोडपं म्हणजे गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) आणि देबीना बॅनर्जी (Debina Bonnerjee) यांची वेगळी क्रेझ आहे. सोशल मीडियावर (Social media viral news) देखील हे जोडपं हिट आहे. त्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणास्तव ते चर्चेत असतात. आताही ते एका प्रतिक्रियेमुळे चर्चेक आले आहेत. त्यांच्या लग्नाला अकरा वर्षे झाली. आता त्यांनी गोड बातमी दिली आहे. त्याची चर्चा आहे. एवढ्या वर्षानंतर दिलेल्या गोड बातमीमुळे नेटकऱ्यांनी त्या दोघांनाही ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. यावरुन गुरमतीनं संतप्त होत नेटकऱ्यांना झापले आहे. सध्या गुरमीतच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या घरी नातेवाईक आले आहेत. एखाद्या सणवाराला असते तसे मोठ्या उत्साहाचे वातावरण त्याप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

देबीना आणि गुरमीतनं एका मुलाखतीमध्ये दरवेळी आपल्याला ज्या कारणावरुन छेडले जाते त्याविषयावर स्पष्ट शब्दांत नेटकऱ्यांना सांगितलं आहे. देबीनाला देखील आई केव्हा होणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, मला आता या प्रश्नाची सवय झाली आहे. नेटकऱ्यांना आमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप काही जाणून घेण्याची इच्छा आहे. आम्ही मी ज्यावेळी प्रेग्नंट होते तेव्हा मला अनेक त्रासांना सामोरं जावं लागलं होतं. मात्र याविषयी लोकांना काही माहिती नाही. ते केवळ चर्चा करतात. त्याचा आम्हाला किती त्रास होतो याचा विचार ते करत नाही.

मुलीच्या नावावरुन गुरमीतनं नेटकऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती. आम्ही योग्य त्यावेळी आमच्या मुलीचं नाव जाहीर करु. गुरमीत आणि देबीनानं वयाच्या 18 व्या वर्षी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला अकरा वर्षे झाली. मात्र अजुनही त्यांची गोड बातमी समोर न आल्यानं नेटकऱ्यांनी गेल्या कित्येकवेळा वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल केले होते. त्यावर अखेर गुरमीतनं नेटकऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. आम्ही आता अकरा वर्षानंतर एका मुलीचे आता पालक झालो आहोत. याचाही आनंद मोठा असल्याचे गुरमीतनं यावेळी सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com