बर्थ डे स्पेशल : गुरुदत्त यांच्या वैवाहिक जीवनात 'या' अभिनेत्रीमुळे आला दुरावा, 'ही' इच्छा देखील राहिली अपूर्ण

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
गुरुवार, 9 जुलै 2020

गुरुदत्त यांचा जन्म गरिबीमध्ये आणि हलाखीच्या परिस्थितीत झाला होता आणि शेवटही फार दुःखद झाला. त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरु होतं मात्र त्यांच्या आयुष्यात एक अभिनेत्री आली जिच्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण झाला.

मुंबई- भारतीय सिनेमात गुरुदत्त प्रतिभावान व्यक्तिमत्व होतं. त्यांनी सिनेमांची निर्मिती करण्यापासून ते दिग्दर्शन, कोरिओग्राफी आणि अभिनयामध्ये त्यांचं नशीब आजमावलं. गुरु दत्त यांचा जन्म ९ जुलै १९२५ साली बंगळुरुमध्ये झाला होता. त्यांचं खरं नाव वसंत कुमार शिवशंकर पादुकोण होतं. गुरुदत्त यांचा जन्म गरिबीमध्ये आणि हलाखीच्या परिस्थितीत झाला होता आणि शेवटही फार दुःखद झाला. त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरु होतं मात्र त्यांच्या आयुष्यात एक अभिनेत्री आली जिच्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण झाला.

हे ही वाचा: कंगना रनौत पूजा भट्टवर संतापली, म्हणाली 'सुशांत आणि रियामध्ये तुझे वडिल काय करत होते?'

गुरुदत्त आणि गीता यांची भेट 'बाजी' सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी गीत रॉय या पार्श्वगायिका म्हणून खूप प्रसिद्ध होत्या. त्यांच्याकडे एक मोठी कार होती. त्या गुरुदत्त यांना भेटायला त्यांच्या माटुंगा येथील घरी यायच्या आणि थेट त्यांच्या किचनमध्ये भाजी कापायला बसायच्या. त्या घरातून गुरुदत्त यांच्या बहीणीला भेटायला जात आहे हे सांगून यायच्या. त्यावेळी राज खौसला गुरु दत्तचे असिस्टंट होते. त्यांना गाण्याचं खूप वेड होतं. गुरु दत्त यांच्याकडे होणा-या बैठकीमध्ये राज खोसला आणि गीता रॉय डुएट गायचे आणि पूर्ण दत्त कुटुंब एकत्र बसून त्यांची गाणी ऐकायचे.

Guru Dutt Death Anniversary When Geeta Roy Left Him And He Commits ...

१९५३ साली गुरु दत्त आणि गीता रॉय विवाहबंधनात अडकले. दोघांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरु होतं. मात्र अचानक 'प्यासा' सिनेमाच्या वेळी गीता आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. याला कारणीभूत होत्या अभिनेत्री वहिदा रेहमान आणि त्यांचं गुरुदत्त यांच्यासोबतची जवळीक. एकेदिवशी गुरुदत्त यांना एक चिठ्ठी मिळाली ज्यात लिहिलं होतं, 'मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही. जर तु माझ्यावर प्रेम करत असशील तर आज संध्याकाळी साडेसहा वाजता मला भेटायला नरिमन पॉईंट इथे ये. तुझी वहिदा.'

जेव्हा गुरुदत्त यांनी ही चिठ्ठी त्यांचा मित्र अबरारला दाखवली तेव्हा त्याने ही वहिदाने लिहिलेली चिठ्ठी वाटत नाही असं म्हटलं आणि मग दोघांनी सत्य शोधण्याचं ठरवलं. तेव्हा त्या ठिकाणी गीता आणि त्यांची मैत्रीण स्मृती बिस्वास त्यांना दिसल्या. घरी आल्यालर दोघांचं खूप भांडण झालं आणि दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते. 

How Guru Dutt Discovered Waheeda Rehman | Best Indian American ...

एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबरला अबरार गुरुदत्त यांना भेटायला गेले होते. त्यावेळी ते दारु पीत होते आणि गीतासोबत त्यांचं फोनवर भांडण झालं होतं. त्यांना त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीला भेटायचं होतं मात्र गीता तिला पाठवत नव्हती. तेव्हा त्यांनी तिला धमकी दिली की 'जर तु मुलीला पाठवलं नाहीस तर तु माझं मेलेलं तोंड पाहशील.' त्यानंतर जेवण करुन त्यांचा मित्र निघून गेला आणि दुस-या दिवशी त्याला गुरुदत्त यांची तब्येत ठिक नसल्याचा फोन आला. 

जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा गुरुदत्त पलंगावर कुर्ता पायजमा घालून पडले होते. पलंगाच्या बाजुला एक ग्लास होता ज्यात गुलाबी पदार्थ थोडा उरलेला दिसत होता. तेव्हा त्याच्या तोंडून हे निघालं की 'गुरुदत्तने स्वतः मारुन टाकलं आहे.' लोकांनी जेव्हा त्याला विचारलं की तुला कसं माहीत तेव्हा त्यांच्या मित्राने सांगितलं की 'आम्ही नेहमी मरणाच्या पर्यायांवर बोलायचो त्यावेळी मला गुरुदत्तने सांगितलं होतं की झोपेच्या गोळ्या अशा घ्यायच्या जसं एक आई लहान मुलांना गोळी देते. पाण्यात पूर्णपणे गोळी विरघळली पाहिजे. अबरारने नंतर सा्ंगितलं की तेव्हा आम्ही मजा म्हणून अशा गप्पा मारायचो पण गुरुदत्त स्वतःच असा प्रयोग करेल असं वाटलं नव्हतं.'  

guru dutt birthday special actors love triangle with geeta dutt and waheeda rehman  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: guru dutt birthday special actors love triangle with geeta dutt and waheeda rehman