...म्हणूनच साकारला 'ट्रान्सजेंडर'! नवाझुद्दीननं सांगितलं कारण|Nawajhuddin Siddique | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawajhuddin Sidhiquei

Nawajhuddin Siddique : ...म्हणूनच साकारला 'ट्रान्सजेंडर'! नवाझुद्दीननं सांगितलं कारण

Nawazuddin Siddiqui shared a fresh look from his upcoming film 'Haddi': बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीनं हा त्याच्या वेगवेगळया भूमिकेसाठी ओळखला जाणारा कलाकार आहे. सध्या तो हड्डीमधून वेगळ्याच रुपात आपल्यासमोर येणार आहे. तो लूक जेव्हा व्हायरल झाला तेव्हापासून चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी नवाझुद्दीनला हीच भूमिका का असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यानं दिलेलं उत्तर हे चर्चेत आलं आहे.

नवाझुद्दीन त्याच्या हड्डी नावाच्या चित्रपटामुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. त्यानं एका मुलाखतीमध्ये बॉलीवूडमध्ये इंट्री केल्यानंतर आपल्याला कोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागलं, कष्टानं त्यातून काढलेला मार्ग, बॉलीवूडमध्ये असलेल्या एका ठराविक गटाचं असणारं वर्चस्व आणि त्याचा आपल्या स्टारडमवर झालेला परिणाम याविषयी नवाझुद्दीननं स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती. आता यासगळ्यात नवाझुद्दीननं आपण ट्रान्सजेंडरची भूमिका का केली याविषयी परखडपणे प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडनं मला खूप काही दिले. त्यासगळ्यात माझ्या चाहत्यांचा मोठा वाटा आहे. मी चाहत्यांमध्ये कधीही भेदभाव करत नाही. पण मला नेहमीच असे वाटत आले आहे की, समाजातील अनेक गोष्टींचे प्रतिबिंब हे माझ्या भूमिकेतून मला प्रेक्षकांसमोर मांडता आले पाहिजे. तसे झाले तर मला खूप आनंद होईल. आता हड्डीच्या निमित्तानं ती संधी मला आली आहे. आणि त्या संधीचे मला सोने करायचे आहे. मला ती भूमिका करताना खूप आव्हाननंही होतं. पण मी काहीही झालं तरी त्या भूमिकेतून वेगळा विचार देणार असल्याचे नवाझुद्दीननं सांगितले आहे.

हेही वाचा: Ketaki Chitale: महाराजांचे नाव घेऊन केतकी पुन्हा बोलली! 'मुंबईत मुसलमानांना...'

गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीनच्या हड्डीची मोठी चर्चा आहे. या चित्रपटातील नवाझुद्दीनचा पहिला लूक जेव्हा प्रेक्षकांसमोर आला तेव्हा त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. चाहत्यांनी त्याच्या या नव्या भूमिकेचे तोंड भरुन कौतूक केले. आम्हाला नवाझुद्दीन या भूमिकेमध्ये कमालीचा भावला. अक्षत अजय शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून अदम्य भल्ला आणि अक्षतनेच त्याचे लेखन केले आहे. या वर्षी नवाझुद्दीन हा टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाच्या हिरोपंती २ मध्ये दिसला होता. मात्र तो चित्रपट काही फारसा चालला नाही.

हेही वाचा: Pathaan Shah Rukh Khan Unwell: शाहरुखची तब्येत बिघडली! खातोय नुसता डाळभात! झालं तरी काय?