नेहा कक्करच्या 'हल्दी सेरेमनीचे' फोटो पाहिलेत ?

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 24 October 2020

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या त्या वेडिंग फेस्टिव्हचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई - बॉलीवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. त्यांच्या त्या वेडिंग फेस्टिव्हचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. शुक्रवारी नेहाच्या हळदी समारंभाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्याचे फोटोही नेहाने आपल्या सोशल मीडियातून व्हायरल केले आहेत. 

याशिवाय राजु मेहंदीवाला याने नेहाच्या मेंहदी रसममधील काही फोटो शेयर केले आहेत. त्याच्यावर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडला आहे. मागील काही दिवसांपूर्वी नेहाने आपल्या रोका सेरेमनीचे फोटो व्हायरल केले होते.  

 
 1. गेल्या काही महिन्यांपासुन नेहा तिच्या नव्या नात्यांच्या बातम्यांमुळे चर्चेत आली  होती. 'राइजिंग स्टार' फेम रोहनप्रीत (Rohanpreet) याच्यासोबतच्या तिच्या रिलेशनशिपला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. तसेच तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. 

 2.  लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून नेहाच्या मेहंदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेहा आणि रोहनप्रीत यांच्या मेंहदीचे फोटोला मोठ्या संख्येने हीटस मिळत आहे.  

रायझिंग स्टार फेम गायक रोहन प्रीत सिंह याच्याशी येत्या २४ ऑक्टोबर रोजी नेहा लग्नगाठ बांधणार आहे.

3.  नेहा आणि रोहनप्रीत यांच्या लग्नावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. आता दिल्लीत त्यांचा विवाह होणार आहे. सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. रोहनप्रीत बरोबरच्या नात्याची जाहीर कबूली दिली होती. 

लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून नेहाच्या मेहंदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4. नेहाच्या फोटोला रोहनप्रीतने कमेंट देऊन नेहाच्या होकाराला दूजोरा दिला आहे. इतकेच नव्हे तर नेहाचे रोहनप्रीतच्या घरच्यांसमवेत फोटोही सोशल मीडियावर व्हायरल केले होते. 

दिल्लीला पोहोचताच नेहाच्या मेहंदी व हळदीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.

5. नेहाने आपल्या हळदीच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ शेयर केले आहे. यावेळी दोघांच्या घरच्यांनीही त्यात सहभाग घेतला आहे. 

Trending: Pics From Neha Kakkar's Haldi Ceremony


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: haldi mehandi ceremony of singer neha and rohanpreet singh