टीव्ही अभिनेता आशिष राॅयला उपचारासाठी हवी आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

आशिष बऱ्याच महिन्यांपासून आजारी असून गोरेगाव येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र आता त्याच्याकडे पुढील उपचार घेण्यासाठी पैसेच उरले नाहीत. त्यामुळे मला आर्थिक मदत करा असे आवाहन तो करत आहे.

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने छोटा पडदा गाजवणारा अभिनेता म्हणजे आशिष रॉय. बा बहु और बेबी, ससुराल सिमर का, मेरे आंगन मैं, कुछ रंग प्यार के ऐसे भी यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये आशिषने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. मालिकांमधील हटके भूमिकांमधून आशिष घराघरांत पोहचला. फक्त मालिकांपर्यंतच तो राहिला नाही. तर काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्याने छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. चंदेरी दुनियेतील हा ओळखीचा चेहरा मात्र आता एका मोठ्या संकटात सापडला आहे. आशिष बऱ्याच महिन्यांपासून आजारी असून गोरेगाव येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र आता त्याच्याकडे पुढील उपचार घेण्यासाठी पैसेच उरले नाहीत. त्यामुळे मला आर्थिक मदत करा असे आवाहन तो करत आहे.

हे ही वाचा - कॅन्सरग्रस्त मुलांच्या पाठिशी विवेक ओबेरॉय, 'जान है तो जहान है' म्हणत केला व्हिडिओ शेअर

2018मध्ये आशिषला पॅरेलिसिसचा अटॅक आला. त्यानंतर यामधून तो थोडाफार सावरला. मात्र त्यानंतर पुन्हा त्याची तब्येत बिघडली. मध्यंतरी फेसबुकद्वारे मला आर्थिक मदत करा असे आवाहन त्याने केले. आशिषची ही पोस्ट पाहून त्याला मदत करण्यास चित्रपट निर्माते, दिग्दर्शक हंसल मेहता पुढे आले. त्यांच्या परीने त्यांनी शक्य तेवढी मदत आशिषला केली.

आशिषनेही फेसबुकवर मला आर्थिक मदत करा अशी पोस्ट शेअर केली होती. खरंच त्याला आर्थिक मदत हवी आहे असे ट्विट आता हंसल मेहता यांनी केले आहे. 'अभिनेता आशिष रॉय खरंच खूप आजारी आहे. तो डायलिसिसवर आहे. मी शक्य तेवढी मदत केली. त्याला इंडस्ट्री असोशिएशन मदत करेल का?' असे ट्विट हंसल मेहता यांनी केले आहे.

Admit TV actor Ashish Roy is not getting any financial help in ICU ...

ह्या ट्विटमध्ये हंसल यांनी इंडियन फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांना देखील टॅग केले आहे. आशिष सध्या डायलिसिसवर आहे. त्याच्याकडे आता रुग्णालयाचे बिल भरण्यासदेखील पैसे शिल्लक नाहीत. गेल्या काही महिन्यांत आजारपणामुळे त्याला मालिकांमध्ये कामही करता आलं नाही. मध्यंतरी एका मुलाखतीत माझ्याकडे आता काहीच पैसे नाही. मला काही जण मदत करतील अशी आशा आहे असे त्याने म्हटले होते. आता आशिषच्या मदतीसाठी कोण पुढाकार घेतं हे पाहावं लागेल.

hansal mehta reach out to help ashiesh roy who is asked for financial support


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hansal mehta reach out to help ashiesh roy who is asked for financial support

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: