'प्रियंका सोबत मी...' इतक्या वर्षांनी हरमन बावेजानं स्पष्ट सांगितलं! |Scoop Web Serise | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scoop Web Serise

Scoop Web Serise : 'प्रियंका सोबत मी...' इतक्या वर्षांनी हरमन बावेजानं स्पष्ट सांगितलं!

Harman Baweja And Priyanka Chopra : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केलेल्या प्रियंकाचे नाव लग्नापूर्वी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींशी जोडले गेले होते.

ज्यांनी व्हाट्स युवर राशी हा प्रियंकाचा चित्रपट पाहिला असेल त्यांना हरमन बावेजा कोण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यावेळी त्याच्या आणि प्रियंकाच्या अफेयरची खूप चर्चाही रंगली होती. आता एका वेबसीरिजच्या निमित्तानं हे दोन्ही सेलिब्रेटी एकत्र येत आहेत. त्यावेळी मुलाखतीतून हरमननं केलेला खुलासा प्रियंकाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक म्हणावा लागेल.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

ऋतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणून हरमन बावेजाकडे पाहिले जात होते. निवडक चित्रपटांमधूनच दिसलेला हरमनचा फार काळ प्रभाव बॉलीवूडमध्ये राहिला नाही. त्याला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला होता. आता तो एका वेबसीरिजमधून स्वताला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. असं म्हटलं जातं की, प्रियंका आणि त्याचे नाते हे मैत्रीपलीकडे होते. व्हाट्स युवर राशीच्या निमित्तानं तयार झालेलं ते नातं प्रेमातही बदललं. पण पुढे ते फार काळ टिकलं नाही.

प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या स्कूप नावाच्या मालिकेमध्ये हे दोन्ही सेलिब्रेटी दिसणार आहेत. त्यात हरमनचा एक नवा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रियंकासोबत हरमनचा लवस्टोरी २०५० नावाचा चित्रपट आला होता. तो २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्यांचा व्हाट्स युवर राशी नावाचाही चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र त्याला प्रेक्षकांचा फार प्रतिसाद मिळाला नाही. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची नाराजी केली होती.

मी आणि प्रियंका आमच्यात चांगली मैत्री होती. सेटवर आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ होतो. पण ते चित्रपट आणि त्या दिग्दर्शकानं सांगितलेल्या काही सुचनांचा तो परिणाम होता. मीडियानं आमच्यातील मैत्रीला वेगळं नाव दिलं. त्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आल्याची प्रतिक्रिया हरमननं दिली आहे. हंसल मेहता दिग्दर्शित स्कूप नावाची मालिका नेटफ्लिक्सवर २ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.