Hansika Motwani ने मोडलं आपल्याच मैत्रिणीचं घर?..लग्नादरम्यान झालेल्या आरोपावर अभिनेत्रीचा मोठा खुलासा Hansika Motwani marry with her best friend's husband | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hansika Motwani with Husband Sohail Khaturiya

Hansika Motwani ने मोडलं आपल्याच मैत्रिणीचं घर?..लग्नादरम्यान झालेल्या आरोपावर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Hansika Motwani wedding video: टी.व्ही आणि सिल्व्हर स्क्रीनवरची प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीनं २०२२ मध्ये सोहेल खतुरियासोबत आपली लग्नगाठ बांधली. या लग्नानंतर हे कपल भलतंच चर्चेत आलं. लग्नाच्या वेळी खरंतर हंसिका मोटवानीवर आरोप केला जात होता की सोहेल खतुरियासोबत लग्न करुन अभिनेत्रीनं आपल्या बेस्ट फ्रेंडच्या संसारात विष कालवलं आहे.

आता यावर या कपलनं स्पष्टिकरण देत प्रतिक्रिया दिली आहे. हंसिका मोटवानीच्या लग्नाला एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केलं गेलं. या दरम्यान हंसिकानं आपल्यावरती लागलेल्या सगळ्या आरोपांचे खंडन करत प्रतिक्रिया दिली आहे.(Hansika Motwani wedding video reaction getting blamed breaking husband first marriage)

हंसिका मोटवानीच्या लग्नावर 'लव्ह शादी ड्रामा' नावाचा एक शो डिस्ने प्लस हॉट स्टारवर स्ट्रीम झाला आहे. यामध्ये दाखवलं गेलं आहे की कपलनं लग्नाची तयारी कशी केली आणि त्यांच्या लग्नसोहळ्याला चाहत्यांनी कसं एन्जॉय केलं.

या व्हिडीओच्या शेवटी दाखवलं गेलं आहे की कपलनं आपल्यावर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं की, ''या बातमीला खूप चुकीच्या पद्धतीनं दाखवलं गेलं''.

हंसिकाचा नवरा सोहेल म्हणाला,''हंसिकासोबत लग्न करण्याआधी माझं पहिलं एक लग्न झालं होतं. पण हंसिकामुळे माझं पहिलं लग्न मोडलं हे जे दाखवलं गेलं ते खूपच चुकीचं आणि अर्थहीन होतं''.

माहितीसाठी इथे सांगतो की,हंसिका मोटवानीचा साखरपुडा झाला होता त्या दरम्यान या गोष्टीला घेऊन चर्चा सुरु झाली होती की सोहेलची पहिली पत्नी कोण होती. हंसिका मोटवानी स्वतः तिच्या नवऱ्याच्या पहिल्या लग्नात सहभागी झाली होती.

बस्स..इथूनच तिला लोकांनी सोहेलच्या पहिल्या लग्नाशी कनेक्ट केलं आणि मग वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. लोकांचे म्हणणे होते की हंसिकानं आपल्या जवळच्या मैत्रिणीचं घर तोडलं..तिच्या संसारात विष कालवून आता स्वतः मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत संसार थाटतेय.

लोकांच्या याच आरोपांवर आता हंसिका आणि तिचा नवरा सोहेलनं स्पष्टिकरण दिलं आहे.

हंसिका मोटवानीनं ४ डिसेंबर २०२२ रोजी जयपुरमध्ये लग्नगाठ बांधली. हंसिकाचं लग्न चर्चेचा विषय ठरलं होतं.

हंसिकानं खरंतर एक ज्यूनिअर आर्टिस्ट म्हणून आपली इंडस्ट्रीतील कारकिर्द सुरू केली होती. तिला सगळ्यात जास्त प्रसिद्धि टी.व्ही शो 'शाकालाका बूम बूम' मुळे मिळाली.

काही काळ छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर हंसिका साऊथ इंडस्ट्रीत निघून गेली आणि तिनं तिथे खूप सिनेमे केले. बॉलीवूडमध्ये मात्र तिला हवं तसं यश मिळालं नाही.