हनुमान'च्या गाण्याचे लॉस एन्जेलिसमध्ये रेकॉर्डिंग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

हनुमानावर याआधीही चित्रपट येऊन गेलाय; पण "हनुमान दा दमदार' हा चित्रपट काही वेगळाच आहे.

हनुमानावर याआधीही चित्रपट येऊन गेलाय; पण "हनुमान दा दमदार' हा चित्रपट काही वेगळाच आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सलमान खान, रविना टंडन अशा अनेक बड्या कलाकारांनी या चित्रपटासाठी आवाज दिलाय आणि या चित्रपटाच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग लॉस एन्जेलिसमध्ये होत आहे. आतापर्यंत मराठीतील फक्त "सैराट' या चित्रपटासाठी तिथे गाण्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले होते.

या चित्रपटातील "आता गं बया' आणि "येड लागलं' या गाण्यांचे रेकॉर्डिंग लॉस एन्जेलिसमध्ये झाले होते. "हनुमान दा दमदार' या चित्रपटानेही ही भरारी घेतली आहे. लेखिका आणि दिग्दर्शिका रूची नारायण म्हणाल्या, "बालचित्रपट बनवतानाही तो लहान मुलांना आवडेल यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यांना कमी लेखून चालत नाही. आम्ही हा चित्रपट यशस्वी करण्यासाठी पराकाष्ठा केली आहे.' हा चित्रपट 2 जूनला प्रदर्शित होईल.  

Web Title: hanuman da damdaar songs recording