
27 जानेवारी 1969 रोजी जन्म झालेल्या बॉबीनं वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले.
मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता बॉबी देओलचा पंजाबी कुटूंबात जन्म झाला. प्रख्यात अभिनेते धर्मेंद्र यांचा तो मुलगा तर अभिनेता आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार सनी देओल याचा लहान भाऊ म्हणूनही तो प्रसिध्द आहे.
प्रसिध्द अभिनेत्री हेमा मालिनी ही बॉबी देओल याची सावत्र आई आहे. चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी बॉबी डीजे म्हणून काम करत होता. त्याचा बॉलीवूडमधील प्रवास मोठा खडतर आहे.
बॉबीची बॉलीवूडमध्ये इंट्री झाली त्यावेळी त्याच्या समोर अनेक तगड्या कलाकारांचे आव्हान होते. सुरुवातीची अनेक वर्षे तो फ्लॉप कलावंत म्हणूनच प्रसिध्द होता. त्याच्या वाट्याला लोकप्रियता त्याच्या करिअरच्या दुस-या टप्प्यात आली.
गेल्या वर्षी बॉबी देओलची आश्रम नावाची वेबसीरिज प्रसिध्द झाली होती. त्यातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्यानं एका भोंदू बाबाची भूमिका केली असून तो स्वतच्या फायद्यासाठी अनेक महिलांचे लैंगिक शोषण करतो असे दाखविण्यात आले आहे. त्याची ही मालिका वादाच्या भोव-यात सापडली आहे. मात्र या मालिकेनं त्याला लोकप्रियता मिळवून दिली असे म्हणता येईल.
1977 मध्ये एक बालअभिनेता म्हणून बॉबीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. धरमवीर नावाच्या चित्रपटात तो बालकलाकार म्हणून दिसला होता.
बॉबीची प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट म्हणजे बरसात. त्यावेळी त्याला दुखापत झाली होती. त्यासाठी तो लंडनमध्ये उपचार घेत होता. त्याचा काही अंशी परिणाम त्याच्या त्या चित्रपटावर झाला.
बॉबीचा पहिला चित्रपट बरसात चांगला हिट झाला. त्याच्या पहिल्या चित्रपटाला फिल्म फेअरच अवॉर्ड मिळालं होतं. या चित्रपटातील गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती.
30 मे 1996 मध्ये बॉबीनं बँकेत काम करणा-या तान्या अहुजा हिच्याशी लग्न केलं.
27 जानेवारी 1969 रोजी जन्म झालेल्या बॉबीनं वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यात बरसात, गुप्त. सोल्जर, हमराज, अजनबी, हे त्याचे काही प्रसिध्द चित्रपट आहेत. दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये बॉबीनं व्यतीत केला आहे.
बॉबीचं खरं नाव विजय सिंग देओल असे आहे. मात्र तो बॉलीवूडमध्ये बॉबी याच नावानं प्रसिध्द आहे. बॉबीला कपड्यांचा मोठा शौक आहे. त्याच्याकडे हजारोच्या संख्येनं शर्ट आणि पँन्टचे जोड आहेत. य़ाशिवाय त्याच्याकडील सनग्लासेस, बेल्ट आणि उंची अत्तरं यांचे कलेक्शन मोठे आहे.