happy birthday Namrata Shirodkar; 'महेशला चित्रपटात काम करणारी बायको नको होती' 

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 22 January 2021

नम्रतानं बॉलीवूडमध्ये सलमान खान बरोबर जब प्यार किसीसे होता है या १९९८ साली आलेल्या चित्रपटातून पदार्पण केले होते. खरं तर तिचा पहिला चित्रपट हा पुरब की लैला पश्चिम की छैला होता. 

मुंबई - बॉलीवूडमधील काही अभिनेत्रींनी फार लवकर चित्रपट क्षेत्रातील करियर सोडून कुटूंबाला प्राधान्य दिले. त्यानंतर त्यांचे छोट्या पडद्यावर आगमन झाले. मात्र तिथेही त्या फार काळ रमल्या नाहीत. आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणून नम्रता शिरोडकरचा उल्लेख करावा लागेल. ९० च्या दशकात या अभिनेत्रीनं आपल्या अभिनयानं सर्वांना जिंकून घेतलं होतं. नम्रताच्या जन्मदिनी तिच्या चित्रपट कारकीर्दिचा घेतलेला हा चित्रमय आढावा.

१. नम्रता केवळ तिच्या अभिनयासाठी नव्हे तर सौंदर्यासाठीही प्रसिध्द होती. एवढं असूनही तिच्या वाट्याला फारसे चित्रपट आले नाहीत. मात्र ज्या सिनेमात तिनं काम केले त्यातून तिनं प्रेक्षकांवर छाप पाडली.

२. महाराष्ट्रातील एका मध्यवर्गीय कुटूंबात २२ जानेवारी १९७२ रोजी नम्रताचा जन्म झाला. तिची दुसरी ओळख सांगायची झाल्यास प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिची ती लहान बहिण तर मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांची ती नात.  ज्यांनी १९३८ मध्ये स्वीमसुट घालून त्यावेळच्या प्रेक्षकांना मोठा धक्का दिला होता.

Namrata Shirodkar birthday: These throwback photos of the actress are set  to win your heart again

३. तुम्हाला माहिती नसेल तर एक गोष्ट सांगावी लागेल ती म्हणजे नम्रतानं १९९३ सालचा मिस इंडियाचा किताब जिंकला होता. याशिवाय ती मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यात ती ५ व्या क्रमांकावर होती.

Pin on Namrata Shirodkar Height, Weight, Age, Biography, Wiki, Family,  Husband

४. नम्रतानं बॉलीवूडमध्ये सलमान खान बरोबर जब प्यार किसीसे होता है या १९९८ साली आलेल्या चित्रपटातून पदार्पण केले होते. खरं तर तिचा पहिला चित्रपट हा पुरब की लैला पश्चिम की छैला होता. त्यात तिच्या जोडीला अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी होते. मात्र हा चित्रपट काही कारणास्तव प्रदर्शित झाला नाही.

Namrata Shirodkar says this while sharing video of Mahesh Babu | NewsTrack  English 1

५. नम्रतानं तिच्या करिअरमध्ये काही प्रसिध्द चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यात वास्तव, पुकार, अस्तित्व, कच्चे धागे यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल.

Bollywood Movie Actress Namrata Shirodkar Biography, News, Photos, Videos |  NETTV4U

६. चित्रपटांबरोबरच नम्रता तिच्या रिलेशनशिप वरुनही काही काळ चर्चेत आली होती. हॉटेल व्यावसायिक दीपक शेट्टी याच्या बरोबर लिव्ह इन मध्ये राहत असल्याचे बोलले गेले. त्यांनी लग्नही केले होते. मात्र ते नातं फार काळ टिकल नाही.

Mahesh Babu reveals the secret for his successful marriage to Namrata  Shirodkar | Telugu Movie News - Times of India

७. नम्रताच्या करिअरचा आलेख हा तिला प्रसिध्द दिग्दर्शक महेश मांजरेकर भेटले तेव्हा  उंचावला. तोपर्यत तिच्या वाट्यासा कोणताही हिट चित्रपट नव्हता. त्यांनी तिला संजय दत्त प्रमुख भूमिका करत असलेल्या वास्तव चित्रपटात महत्वाची भूमिका दिली होती. त्या संधीच नम्रतानं सोनं केलं.

Movies N Memories on Twitter: "Sanjay Dutt and Namrata Shirodkar in Mahesh  Manjrekar's Vaastav (1999) #SanjayDutt #NamrataShirodkar #MaheshManjrekar  @duttsanjay @urstrulynamrata @manjrekarmahesh… https://t.co/MpRDbOmT1E"

८. काही काळानंतर नम्रता ही तेलगू सुपरस्टार महेश बाबुच्या प्रेमात पडली. त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवातही केली. त्यांची ती डेटिंग ५ वर्षे चालली. २००५ मध्ये तिनं त्याच्याशी लग्न केलं.

Happy Birthday Namrata Shirodkar: 5 unseen photos of the former actress  that are unmissable - Bollywood News & Gossip, Movie Reviews, Trailers &  Videos at Bollywoodlife.com

९. महेश आणि नम्रता हे आता हैद्राबादमध्ये राहतात. महेश हा नम्रतापेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. त्यांना गौतम आणि सितारा ही दोन मुले आहेत. ज्यावेळी नम्रतानं महेशशी लग्न केलं तेव्हापासून तिनं चित्रपट क्षेत्र सोडले. तिनं सांगितले, महेशला चित्रपटात काम करणारी बायको नको होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday actress Namrata Shirodkar interesting facts about her Bollywood career