आज आहे मिस वर्ल्ड ऐश्वर्य़ा रॉयचा वाढदिवस, जाणून घ्या तिच्या फिटनेसमागचं कारण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

Happy Birthday Aishwarya : ऐश्वर्या 9 वर्षीय आराध्याची आई आहे, तरीही तिचं सौंदर्य आणि फिटनेस कायम आहे.जाणून घ्या ऐश्वर्याच्या फिटनेसमागचं कारण !

मुंबई : विश्वसुंदरी आणि बॉलिवूडची सर्वात देखणी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन हिचा आज वाढदिवस आहे. आज तिच्या 46 व्या वाझदिवसानिमित्त सकाळ टीमकडून खूप खूप शुभेच्छा. ऐश्वर्या 9 वर्षीय आराध्याची आई आहे, तरीही तिचं सौंदर्य आणि फिटनेस कायम आहे. सिनेमांपासून ऐश्वर्या थोडी दुरावली असली तरी मात्र फिटनेस आणि सौंदर्याने ती सतत चर्चेत असते. जाणून घ्या ऐश्वर्याच्या फिटनेसमागचं कारण !

Image may contain: 4 people

ऐश्वर्याला तासन् तास जिममध्ये राहायला आवडत नाही. त्यामुळे आराध्या झाल्यानंतर तिला वजन कमी करणं खूप कठीण होतं. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या म्हणाली होती,' मी वर्कआउट साठी कधीच फार गंभीर नव्हते. वर्कआउटपेक्षा मी योग करण्यावर जास्त विश्वास ठेवते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

20 years with Longines Super Precious n Super Special 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

 योग केल्याने तुमचं शरीर फक्त लवचिक होत नाही तर त्याचसोबत पावरफुलदेखील होतं, असं मत ऐश्वर्याने व्यक्त केलं. योगसोबत ऐश्वर्य़ा दररोज सकाळी जॉगिंग आणि 'ब्रिक वॉक' न चुकता करते. ब्रिक वॉक या प्रकारामध्ये एका मिनीटामध्ये 100 पावलं चालायली असतात. ऐश्वर्य़ा या सगळ्या व्यायामासह 45 मिनिटं पावर योग करते. हे सर्व करत असतानाच ती आठवड्यातून एक-दोन वेळा जिमला जाते आणि  त्यावेळी संपूर्ण 'कार्डीयो' करते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयसाठी आराध्याच्या जन्मानंतर वजन कमी करणे कठीण होते मात्र त्यावर मात करत आजही तिने फिटनेस चांगलाच सांभाळला आहे. याशिवाय ती आर्युवेदीक गोष्टींवर अधिक भर देते. ती कधीच सकाळचा नाश्ता सोडत नाही. त्यामध्ये फायबर आणि प्रोटीनने भरपूर असलेल्या घरघूती पदार्थांचा ती समावेश करते. दिवसाची सुरुवात एक ग्लास गरम पाणी आणि लिंबू यासह करते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

जंक फूड पासून ऐश्वर्या शक्त तितके दूरच राहते आणि फळं, ज्युस यांच्यावर अधिक भर देते. स्वत: ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ती दिवसातून भरपूर वेळा पाणी पिते. ऐश्वर्या लवकरच तिचा आगामी चित्रपट 'फन्ने खान' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happy Birthday aishwarya Know what is her secret behind fitness