HappyBirthdayAkshayKumar: अक्षयच्या पृथ्वीराजचा टिझर पाहिला का?

टीम ई-सकाळ
Monday, 9 September 2019

सध्या बॉलिवूडमधील सगळ्या बिझी कलाकार म्हणून, अक्षय कुमारचा उल्लेख केला जातो. गेली २८ वर्षे अक्षयकुमार इंडस्ट्रिमध्ये काम करत आहे. वर्षात किमान तीन-चार सिनेमे करणाऱ्या अक्षयचे पुढच्या दिवाळीपर्यंत एक-दोन नव्हे, तर सहा सिनेमे रिलीज होणार आहेत.

मु्ंबई :  सध्या बॉलिवूडमधील सगळ्या बिझी कलाकार म्हणून, अक्षय कुमारचा उल्लेख केला जातो. गेली २८ वर्षे अक्षयकुमार इंडस्ट्रिमध्ये काम करत आहे. वर्षात किमान तीन-चार सिनेमे करणाऱ्या अक्षयचे पुढच्या दिवाळीपर्यंत एक-दोन नव्हे, तर सहा सिनेमे रिलीज होणार आहेत. सध्या अक्षय काय करू शकत नाही असं नाही, अशी इंडस्ट्रीत चर्चा सुरू आहे. यावर्षी त्यानं केसरी हा ऐतिहासिक सिनेमा केला होता. आता त्याच्या पृथ्वीराज या सिनेमाची घोषणा झाली आहे. यशराजा फिल्मसच्या या सिनेमात अर्थातच अक्षय मुख्यभुमिकेत असणार आहे. महान योद्धा पृथ्वीराजसिंह चौहान यांच्या जीवनावर हा सिनेमा असणार आहे. अक्षयचा आज वाढदिवस असून, त्यानं वाढदिवसाच्या निमित्तानं या सिनेमाची घोषणा करत, टिझरही लाँच केलाय.

Video : अमृता खानविलकर काय घेतीय जिममध्ये मेहनत

बॉलिवूडमध्ये दबदबा
बॉलिवूडमधील कोणत्याही घराण्याचा टॅग नसताना, प्रचंड मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर अक्षयकुमारनं इंडस्ट्रित स्वतःचा दबदबा निर्माण केलाय. बॉलिवूडमध्ये खानांचे वर्चस्व असताना अक्षयनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज आमीर खान ५२वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तो आज इंडस्ट्रितील बिझी कलाकार आहे. जवळपास तीन पिढ्यांमधील अभिनेत्रींसोबत अक्षयनं काम केलंय. त्याच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री इंडस्ट्रितून बाहेर पडून १५-२० वर्षे झाली आहेत.

पाहा इमरान खान यांचा नया पाकिस्तान; गुंतवणूक कार्यक्रमात बेली डान्स

आता चर्चा पृथ्वीराजची
सुरुवातील केवळ अॅक्शन सिनेमा करणाऱ्या अक्षयनं हेराफेरीनंतर कॉमेडीही केली. अॅक्शन हा त्याचा प्लस पॉइंट असला तरी, त्यातही त्यानंतर साचेबद्धपणा टाळला आहे. पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा, गब्बर इज बॅक सारख्या सिनेमांमधून त्यानं सामाजिक संदेशही दिले आहेत. नुकताच त्याचा केसरी सिनेमा येऊन गेला. त्यालाही प्रेक्षकांनी उचलून धरलं. विशेषतः उत्तर भारतात या सिनेमाला खूप प्रतिसाद मिळाला. रोहित शेट्टीसोबत तो सूर्यवंशी सिनेमा करत आहे. त्याच्याबरोबरच हाऊसफुल फोर, बच्चन पांडे, गूड न्यूज, लक्ष्मी बॉम्ब हे त्याचे आगामी सिनेमे असणार आहेत. या सगळ्यात आता त्याच्या पृथ्वीराज सिनेमाची उत्सुकता लागली आहे. आदित्य चोप्रा याची निर्मिती करत असून, पिंजर सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश द्विवेदी याचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी चाणक्य ही टीव्ही सिरिअलही दिग्दर्शित केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday akshay kumar historical prithviraj film teaser release