हॅप्पी बर्थडे चार्ली चॅपलीन: बॉलीवूडच्या 'या' कलाकारांनी साकारलेल्या चार्लीच्या भूमिका अजरामर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हसतमुख चेहरा म्हणजे चार्ली चॅपलीन..या कलाकाराची आज 131वी जयंती आहे. आपल्या जवळपास 75 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी संगीतकार, निर्माता, लेखक म्हणूनही काम केले. चार्ली यांच्यासारखा कलाकार कलाक्षेत्रात पुन्हा होणे नाही असेच म्हणावं लागेल.

मुंबई- चेहऱ्यांवरील हावभाव, हातवारे करत प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेता म्हणजे चार्ली चॅपलिन. जगातील सुप्रसिद्ध विनोदवीर हा मान चार्ली यांनी तर पटकावलाच. पण त्याचबरोबरीने एकही संवाद न म्हणता प्रेक्षकांपर्यंत आपलं काम पोहचवण्यात चार्ली यशस्वी ठरले. अगदी आपल्या खाजगी आयुष्यात आलेलं संकट चेहऱ्यावर न दाखवता नेहमीच हसतमुख चेहऱ्याने त्यांनी जगभरातील प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हासू आणलं. ते उत्तम दिग्दर्शकही होते. सर्वगुण संपन्न असलेल्या अशा या कलाकाराची आज 131वी जयंती आहे. आपल्या जवळपास 75 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी संगीतकार, निर्माता, लेखक म्हणूनही काम केले. चार्ली यांच्यासारखा कलाकार कलाक्षेत्रात पुन्हा होणे नाही असेच म्हणावं लागेल.

हे ही वाचा: दीपिकानंतर आता रणवीर बनला शेफ.. केक बनवतानाचा 'हा' व्हिडिओ पाहाच

अनेक दिग्गज कलाकारांचे चार्ली चॅपलिन प्रेरणास्थान आहेत. बॉलिवूडमधील बरेच कलाकार चार्ली यांना प्रेरणास्थान मानतात. वयाच्या 13व्या वर्षी आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या चार्ली यांना आपलं करिअर घडवण्यात बऱ्याच कठीण परिस्थितींचा सामना देखील करावा लागला. मात्र त्या सगळ्यावर मात करत ऑस्कर तसेच अनेक नामांकित पुरस्कारांवर त्यांनी आपला ठसा उमठला. चार्ली चॅपलिन यांच्यापासून प्रेरित होऊन बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी रुपेरी पडद्यावर भूमिका साकारल्या. आता त्यावरच एक नजर टाकुयात.

Actors who played desi Charlie Chaplin - Movies News

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांना हिंदी सिनेमातील चार्ली चॅपलीन म्हणून ओळखलं जातं. त्यांनी श्री 420 या चित्रपटात साकारलेली भूमिका चार्ली यांची आठवण करुन देणारीच होती. सुख आणि दुःख या दोन्ही भावनांचा मेळ घालणारी राज कपूर यांची भूमिका या चित्रपटात होती. ती त्यांनी उत्तमरित्या पेलली. तसेच `मेरा नाम जोकर`, `आवारा` या चित्रपटातही त्यांनी अशाच प्रकारची भूमिका साकारली. आजही त्यांचे हे चित्रपट पाहिले की चार्ली यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

Happy Birthday Charlie Chaplin: When Sridevi paid tribute to ...

चार्ली यांच्या गेटअपमध्ये रुपेरी पडद्यावर दिसलेली अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. `मिस्टर इंडिया` या चित्रपटात श्रीदेवी चार्ली यांच्याच गेटअपमध्ये दिसल्या होत्या. त्यांची या चित्रपटातील ही अतरंगी भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणारी होती. या चित्रपटातील त्यांच्या अगदी साध्यासरळ हालचालींमधून त्या सिनेरसिकांच मनोरंजन करण्यात यशस्वी ठरल्या होत्या.

Bollywoodirect on Twitter: "Happy Birthday #CharlieChaplin Left ...

एव्हरग्रीन `शोले` चित्रपटात जेलरची भूमिका असरानी यांनी साकारली होती. असरानी यांची ही भूमिका चार्ली यांच्या `द ग्रेट डिक्टेटर` या चित्रपटातील एडोल्फ हिटलरशी मिलतीजुळती होती. असरानी यांनी चार्ली चॅपलिन आणि एडोल्फ हिटलर ही भूमिका लक्षात ठेऊन जेलरची भूमिका साकरली होती.

Ranveer Singh's tribute to Charlie Chaplin is now viral - Rediff ...

Vidya Balan to play Charlie Chaplin on-screen! | PINKVILLA

तसेच नव्या पिढीतील बऱ्याच कलाकारांनी स्पेशल फोटोशूटसाठी चार्ली यांचा वेश परिधान केला.

4 Times Bollywood Went The Charlie Chaplin Way!

पण यंगस्टर अभिनेता रणबीर कपूरने अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटाच्या एका सीनसाठी चार्ली यांचा गेटअप केला होता. तसेच बर्फी चित्रपटासाठी देखील त्याने चार्ली यांच्यापासून प्रेरणा घेत भूमिका साकारली.

happy birthday charlie chaplin


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday charlie chaplin