बॉलिवूडच्या मस्तानीवर वाढदिवसानिमीत्त शुभेच्छांचा वर्षाव

शनिवार, 5 जानेवारी 2019

आज बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोनचा वाढदिवस आहे. ती आता 33 वर्षीची झाली आहे. लग्नानंतर दीपिकाचा हा पहिला वाढदिवस आहे. माहितीनुसार, दीपिका आपला पहिला वाढदिवस सासरी सेलिब्रेट करणार आहे. दीपवीरच्या फॅन्सना अपेक्षा आहे की रणवीर सिंग दीपिकाचा पहिला बर्थ डे स्पेशल पद्धतीने सेलिब्रेट करेल. 

मुंबई- आज बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोनचा वाढदिवस आहे. ती आता 33 वर्षीची झाली आहे. लग्नानंतर दीपिकाचा हा पहिला वाढदिवस आहे. माहितीनुसार, दीपिका आपला पहिला वाढदिवस सासरी सेलिब्रेट करणार आहे. दीपवीरच्या फॅन्सना अपेक्षा आहे की रणवीर सिंग दीपिकाचा पहिला बर्थ डे स्पेशल पद्धतीने सेलिब्रेट करेल. 

दीपिकाने वयाच्या 17 व्या वर्षी दीपिकाने ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवले. पदार्पणातच ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणा-या दीपिकाला चित्रपटसृष्टीने सहजासहजी स्वीकारले नाही. दाक्षिणात्य उच्चार आणि अभिनयाचा अभाव यामुळे तिला चित्रपटसृष्टीत नाव कमाविण्यासाठी परिश्रम करावे लागले. काही खराब चित्रपट आणि चुकीच्या निर्णयानंतर 2009 साली तिला अखेर चांगला ब्रेक मिळाला. सैफ अली खानसोबतच्या ‘लव्ह आज कल’ चित्रपटातील तिच्या कामाची वाहवा झाली. त्यानंतर आजवर तिने मागे वळून पाहिलेले नाही. 

आज तिच्या वाढदिवसानिमीत्त अनेक दिग्गजांसोबतच तिच्या फॅन्सनीही तिला शुभेच्छा देऊन सदिच्छा दिल्या आहेत.
 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Happy Birthday Deepika Padukone As Deepika turns 33.