४७ वर्षांचा झाला हृतिक रोशन, फिट राहण्यासाठी असं करतो डाएट..

दिपाली राणे-म्हात्रे
Sunday, 10 January 2021

हृतिक रोशनला आशियातील सगळ्यात सेक्सी पुरुष म्हणून घोषित केलं गेलं होतं. हृतिक त्याच्या अभिनयासोबतंच त्याच्या जबरदस्त डान्ससाठी प्रसिद्ध आहे.

मुंबई- अभिनेता हृतिक रोशन आज त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. हृतिक रोशन इंडस्ट्रीमधील फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिक रोशनला आशियातील सगळ्यात सेक्सी पुरुष म्हणून घोषित केलं गेलं होतं. हृतिक त्याच्या अभिनयासोबतंच त्याच्या जबरदस्त डान्ससाठी प्रसिद्ध आहे. तो त्याच्या डाएटमध्ये खूप सारं प्रोटिन आणि भाज्या घेतो. त्याला संतुलित आहार आणि कमी तेल असलेलं खाणं जास्त पसंत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या या फिटेनस आणि  खास डाएटविषयी..

हे ही वाचा: 'जेव्हा पहिल्यांदा माझ्या वडिलांना मी रडताना पाहिलं', अमिताभ यांनी शेअर केली भावूक पोस्ट​

मिडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशनला भाज्या खायला खूप आवडतात. तो जास्तकरुन हेद्धी डाएट खाणं पसंत करतो. उकडलेल्या भाज्या त्याच्या डाएटमध्ये समाविष्ट आहेत. तो त्याच्या खाण्यामध्ये अगदी कमी तेल असलेलं खातो. विशेष म्हणजे हृतिक रोशन वर्कआऊट केल्यानंतर ४५ मिनिटे काहीही खात नाही.  तो दिवसभरात जे काही डाएट घेतो त्यामध्ये कमीत कमी दोन तासांचं अंतर आवर्जुन ठेवतो. हृतिक त्याच्या वर्कआऊटने वजन कमी जास्त करत असतो.

नॉर्मल डाइट ही लेते हैं ऋतिक फिर हैं फिट, ये हैं उनकी डेली रुटीन -  bollywood-actor-hrithik-roshan-fitness-and-diet-secrets - Nari Punjab Kesari

'सुपर ३०' या सिनेमासाठी जिथे हृतिकने वजन कमी केलं होतं तर वॉर सारख्या सिनेमासाठी लवकर बॉडी बनवण्यामध्ये देखील तो यशस्वी झाला होता. हृतिक जीममध्ये १ तास घाम गाळतो आणि त्याची बॉडी एवढी परफेक्ट आहे की तो एकावेळी ५०० क्रंच करतो. हृतिकचा त्याच्या डाएटमधील आवडता पदार्थ आहे ब्रोकोली जो त्याचा समावेश त्याच्या प्रत्येक पदार्थात असतो. हृतिक त्याच्या जेवणामध्ये अंड्याचा सफेद भाग, चिकन आणि मासे खाणं पसंत करतो. ज्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असते जे नसांना मजबुत बनवण्यासोबतंच फिट राहण्यासाठी उपयोगी ठरतं.    

happy birthday hrithik roshan know hrithik diet and workout  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday hrithik roshan know hrithik diet and workout