बर्थडे स्पेशल: माधुरी दीक्षित केवळ नंबर वन अभिनेत्रीच नाही तर एकेकाळची कॉन्ट्रोवर्सी क्वीन होती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

माधुरीने तिच्या या सिने कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. यादरम्यान असं देखील घडलं जेव्हा माधुरी सिनेमांपेक्षा जास्त तिच्या वाद-विवादांमुळे चर्चेत राहिली. 

मुंबई- बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून प्रसिद्ध असेलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित आज ५२ वर्षांची झाली. अबोध या सिनेमापासून करिअरची सुरुवात केलेल्या माधुरीने तिच्या आयुष्यात ते सगळं कमवलं ज्याची तिने स्वप्न पाहिली होती. अनेक वर्ष बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारी माधुरी तिच्या अफलातून नृत्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. माधुरीला बॉलीवूडची डान्सिंग क्वीन असं देखील म्हटलं जातं. 

हे ही वाचा: जेव्हा दीपिका-रणवीरने '83'च्या पार्टीत असा केलेला जबरदस्त डान्स.. व्हिडिओ व्हायरल

१९८४ मधील अबोध या सिनेमातून तिने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. अनिल कपूरसोबत तिची जोडी नेहमीच हिट ठरली. माधुरीचा शेवटचा सिनेमा गुलाब गँग होता ज्यात ती जुही चावलासोबत दिसून आली होती. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर कमाल दाखवू शकला नाही. माधुरीने तिच्या या सिने कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. यादरम्यान असं देखील घडलं जेव्हा माधुरी सिनेमांपेक्षा जास्त तिच्या वाद-विवादांमुळे चर्चेत राहिली. 

Madhuri Dixit, Madhuri and Amitabh Bachchan in a still from yet...

माधुरी दीक्षितचं नाव त्यावेळी वादात अडकलं जेव्हा ती अमिताभ यांच्यासोबत सिनेमे करण्यास नकार द्यायला लागली. अनेक निर्मात्यांना तिला बिग बींसोबत कास्ट करण्याची इच्छा होती मात्र यात केवळ डेविड धवन यशस्वी झाले जेव्हा त्यांनी तिला 'बडे मिया छोटे मिया' मध्ये बिग बींसोबत कास्ट केलं. असं म्हटलं जातं की बिग बींसोबत काम नाकारण्याला अनिक कपूरसोबतची तिची जवळीक कारणीभूत होती.

Truth Of Madhuri Dixit And Anil Kapoor Love Story On Valentine ...

अनिल कपूर यांना त्यावेळी लोक पुढचा अमिताभ मानायचे. त्या दोघांमध्ये त्यावेळी स्पर्धा होती असं लोक मानायचे. अनिल आणि माधुरी यांच्या अफेअरच्या चर्चा जेव्हा सुरु झाल्या तेव्हा एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत तिने स्वतःची बाजू मांडली आणि हळूहळू त्यांच्यासोबत काम करणं कमी केलं.

Vinod Khanna Death Anniversary: Lesser Known Facts About Most ...

'दयावान' सिनेमात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्नाचा ऑनस्क्रीन किसींग सिंग बॉलीवूडचा सगळ्यात वल्गर किसींग सीन मानला जातो. यामुळे माधुरी अनेकांच्या निशाण्यावर होती. त्यामुळे जेव्हा हा सीन काढण्यासाठी तिने फिरोज खान यांच्यावर दबाव टाकायला सुरुवाच केली तेव्हा त्यांनी तीला एग्रीमेंट दाखवत तिची बोलती बंद केली. 

Is this true that Sanjay Dutt and Madhuri Dixit were getting ...

१९९० मध्ये माधुरी दीक्षित आणि संजय दत्त इंडस्ट्रीतील हॉट कपल होते. त्यांचे रोमान्सचे किस्से म्हणजे मिडियाच्या गॉसिपसाठी एक खजानाच होता. माधुरीच्या अशा सततच्या बातम्यांमुळे तिचे घरचे खूपंच नाराज होते. सिनेमांपेक्षा जास्त तिच्या संजयसोबतच्या अफेअरचेच किस्से चर्चेत यायला लागल्याने तिला  सतत तिची बाजु मांडावी लागायची. याचदरम्यान संजय दत्तला जेलची शिक्षा झाली आणि इथेच त्यांचं नातं संपुष्टात आलं. 

Madhuri Dixit talks about taking up late Sridevi's role in Kalank ...

माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जायचे. श्रीदेवीने नाकारलेले कित्येक सिनेमांनी माधुरीच्या करिअरचं सोनं केलं. यातलंच एक नाव म्हणजे बेटा हा सिनेमा ज्यामुळे माधुरीला धकधक गर्ल ही ओळख मिळाली. असं म्हटलं जायंचं की श्रीदेवी आणि माधुरी एकमेकांसोबत काम करण्याच्या अनेक ऑफर्स फेटाळून लावायच्या.

Madhuri Dixit,Juhi Chawla celebrate the triumphs of women ...

नंतर यात प्रतिस्पर्धी म्हणून जुही चावलाचं नाव देखील जोडलं गेलं. मात्र जुहीने करण जोहरच्या शोमध्ये माधुरीसोबत स्पर्धा याला बालिश विचार असं म्हटलं होतं.

इतकंच नाही तर महाराष्ट्र सरकार माधुरीला त्यांचा ब्रँड अम्बासिडर बनवण्यासाठी इच्छुक होते मात्र माधुरीने याबदल्यात १० कोटींची मागणी केली होती. या बातम्या बाहेर आल्यानंतर तिने याची सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला होता. 

यासोबतंच एका न्युडल्सची जाहीरात करणारी माधुरी त्यावेळी वादात अडकली जेव्हा ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ उत्तराखंडने त्यांना यासाठी नोटिस बजावली होती. हे न्युडल्स शरिरासाठी हानिकारक असल्याचं सांगत सरकारने त्याच्यावर बॅन आणला होता. मात्र जेव्हा त्यांना या जाहीरातीत सतत माधुरी दिसायला लागली तेव्हा तिला अटक करण्याची धमकी देखील दिली गेली. मात्र या वादात तिच्यासोबत अमिताभ यांच्या नावाचा देखील समावेश होता.   

happy birthday madhuri dixit controversies of dancing queen madhuri dixit  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday madhuri dixit controversies of dancing queen madhuri dixit