पत्नीच्या वाढदिवशी पोस्ट केला 'किसिंग' 'फोटो!, रॉनित रॉय चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीच्या वाढदिवशी पोस्ट केला 'किसिंग' 'फोटो!, रॉनित रॉय चर्चेत
पत्नीच्या वाढदिवशी पोस्ट केला 'किसिंग' 'फोटो!, रॉनित रॉय चर्चेत

पत्नीच्या वाढदिवशी पोस्ट केला 'किसिंग' 'फोटो!, रॉनित रॉय चर्चेत

मुंबई - टीव्ही मनोरंजन आणि रियॅलिटी शो मध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणून रॉनित रॉयची ओळख आहे. त्याने बॉलीवूडच्या मेन स्ट्रीममध्ये देखील काम केले आहे. अनेक दिग्गजांसमवेत त्यानं भूमिका केल्या आहेत. मात्र काही काळापासून तो चित्रपटापेक्षा ओटीटी माध्यमांवर सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. आपल्या वेगळ्या अभिनय शैलीमुळे नेहमीच जाणकार प्रेक्षक आणि अभ्यासक यांची वाहवा मिळवणारा रॉनित आता त्याच्या पत्नीसमवेत काढलेल्या फोटोमुळे चर्चेत आला आहे.

रॉनित रॉय त्याच्या भूमिकेमुळे जसा ओळखला जातो त्याचप्रमाणे तो सोशल मीडियावर त्याच्या वेगवेगळ्या फोटोंमुळेही लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यानं नुकताच पत्नी नीलम सिंह हिच्यासोबत तिचा जन्मदिन साजरा केला. आज तिचा जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं त्यानं काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. यावेळी रॉनितनं जो फोटो सोशल मीडियावर शेय़र केला आहे. त्यावरुन त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. त्याच्या त्या फोटोची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्यानं निलमला किस करतानाचा फोटो शेयर करुन चाहत्यांची वाहवा मिळवली आहे. तर नेटकऱ्यांच्या रोषालाही त्याला सामोरं जावं लागलं आहे.

त्या फोटोंतून त्यानं पत्नी नीलमला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांशी नियमित संवाद साधण्यासाठी, त्यांची पसंती मिळवण्यासाठी रॉनित रॉय हा नेहमीच चर्चेत असतो. त्यासाठी तो नियमितपणे फोटो आणि व्हिडिओही शेयर करतो. त्यानं आतापर्यत पत्नी नीलमसोबत वेगवेगळ्या प्रकारचे रोमँटिक फोटो शेयर केले आहेत. त्या फोटोंमध्ये रॉनितनं नीलमला किस करतानाचा फोटो शेयर केला आहे. चाहत्यांनी त्या फोटोला प्रतिसाद देत नीलमला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: 'तारक मेहता'च्या' टप्पू - बबिताचं बिंग अखेर फुटलं

loading image
go to top